घर महाराष्ट्र शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याला झळाळी येणार; सप्टेंबरमध्ये दर दुप्पट होण्याची शक्यता

शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याला झळाळी येणार; सप्टेंबरमध्ये दर दुप्पट होण्याची शक्यता

Subscribe

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कांद्याचे दर हे 55 ते 60 रुपये प्रति किलोवर जातील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते, परंतु पुन्हा कांद्याची दरवाढ झाली आहे. प्रतिकिलो दरात कमीत कमी 2 ते 3 रुपये वाढ झाली आहे. एपीएमसीत कांद्याची आवक कमी असून 50% ते 60 % हलक्या प्रतिचा कांदा दाखल होत आहे. तसंच, पावसानं दडी मारल्यानं नवीन कांदा लागवड केलेले उत्पादनदेखील हाती लागणार नाही. त्यामुळे पुढच्या कालावधीत कांदा अधिक वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( Relief to farmers onion Rates likely to double in September )

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कांद्याचे दर हे 55 ते 60 रुपये प्रति किलोवर जातील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. देशात सध्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, बराचसा कांदा खराब झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कांदा महाग होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये कांद्याचे घाऊक भाव 5 रुपये प्रति किलो ते 24 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 25 ते 35 रुपये प्रति किलोवर गेले आहेत.

- Advertisement -

बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. तसंच, अनेक भागात झालेल्या पावसाचाही पिकावर परिणाम झाला आहे. तसंच, काही भागात साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब देखील झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दर नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडून गेला. बाजारात कांदा विकायला नेणं देखील शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदादेखील काढला नव्हता. त्यामुळे जमा करून ठेवलेला कांदा पुढच्या महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत.

( हेही वाचा: Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू )

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचा दर हे स्थिर होते. मात्र, सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी कांदा मार्केटमध्ये दरवाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोनं मिळणारा कांदा आज 30 रुपये किलोपर्यंत गेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्यांना आता फायदा होणार आहे.

- Advertisment -