Eco friendly bappa Competition
घर क्राइम पोलिसानेच केले अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

पोलिसानेच केले अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Subscribe

पोलीस प्रशिक्षण क्लास चालवणाऱ्या पोलिसाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून या प्रकरणी नालासोपारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे.

नालासोपारा : पोलीस प्रशिक्षण क्लास चालवणाऱ्या पोलिसाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून या प्रकरणी नालासोपारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. पीडित मुलींनी दिलेल्या जबाबानंतर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील गंभीर बाब म्हणजे या आरपोी पोलीस प्रशिक्षकासोबतच त्याच्या पोलीस मैत्रिणीवर सुद्धा या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे. (Nalasopara, minor girls were sexually abused by the police.)

हेही वाचा – गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी, मुंबई मनपाने नवीन हमीपत्रातून ‘ही’ अट काढली

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान गावडे (वय वर्ष 28) नामक आरोपी पोलीस प्रशिक्षक हा नालासोपाऱ्यात ‘विजयी भव’ नावाचे पोलीस प्रशिक्षणाचे क्लास चालवत होता. त्याच्या या क्लासमध्ये अनेक मुली प्रशिक्षणाकरिता येत होत्या. याच गोष्टीचा फायदा घेऊन या आरोपी प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना अश्लील मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेकदा आरोपी गावडेने मुलींना व्हिडीओ कॉल करून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य देखील करत होता.

त्याशिवाय, शिकविण्याच्या नावाखाली गावडे हा मुलींच्या अंगाला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत. अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा. तर काही वेळा त्यांना फिरायला बोलवत होता. परंतु त्याच्या या सर्व कृत्यांना वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची 25 वर्षीय मैत्रीण पाठिंबा देत होती. आरोपी गावडेच्या या पोलीस मैत्रिणीने एका पीडित मुलीचे व्हॉट्सॲप स्कॅन करून आरोपी गावडेबरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. ज्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने क्लासेसमध्ये जाणे बंद केले होते.

- Advertisement -

पण अखेरीस, गावडेकडून होणाऱ्या या कृत्याला कंटाळून पीडित मुलींनी बुधवारी (ता. 09 ऑगस्ट) नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस प्रशिक्षक समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2022 च्या (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुरुवारी (ता. 10 ऑगस्ट) त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास तुपे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -