घरताज्या घडामोडीएका मिसळमध्ये पोट भरले, 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं, रोहित...

एका मिसळमध्ये पोट भरले, 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं, रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी २०० वडापाव फस्त केले. याचे बिल दिले नाही असा आरोप करण्यात आला होता. परंतु यानंतर स्थानिक नेत्यांनी पैसे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरुनच रोहित पवारांनी टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा घेतला आहे. एका मिसळमध्ये पोट भरल्यावर ३५ मिसळ खाण्याच्या नुसती कल्पना करुन कसंतरी झालं असा चिमटा रोहित पवारांनी घेतला आहे. तसेच मिसळ खाल्यानंतर त्याचे पैसे दिले असल्याचा टोलाही रोहित पवारांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. रोहित पवारांनी एक ट्विट करत दोन टीकास्त्रे भाजपवर सोडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे. मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं.. आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं. अशा आशयाचे ट्विट करुन रोहित पवारांनी भाजप नेत्यांवर टोलवा टोलवी केली आहे.

- Advertisement -

३५ मिसळवरुन फडणवीसांना टोला

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ३५ मिसळवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी एका कार्यक्रमात फडणवीसांबाबत किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस किती पोळ्या खाऊ शकतात असे अमृता फडणवीसांना विचारण्यात आले होते. यावर त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस ३० ते ३५ पोळ्या पातेलभर तूपासोबत खातात असे त्यांनी सांगितले होते. त्यांना आता ३० ते ३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची इच्छा नाही असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

- Advertisement -

ठाण्यातील भाजप नेत्यांना बिल न भरण्यावरुन टोला

ठाण्यात गजानन वडापाव सेंटरमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री वडापाव खात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी २०० वडापाव फस्त केले. याचे बिल दिले नाही असा आरोप करण्यात आला होता. परंतु यानंतर स्थानिक नेत्यांनी पैसे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरुनच रोहित पवारांनी टोला लगावला आहे.


हेही वाचा : Sameer Wankhede : बार परवानाबाबतची FIR रद्द करण्यासाठी वानखेडेंची कोर्टात धाव, मंगळवारी सुनावणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -