घरमहाराष्ट्रवाझे वापरत असलेली मर्सिडीज NIA च्या ताब्यात; कारमधून डायरी, शर्ट आणि ५...

वाझे वापरत असलेली मर्सिडीज NIA च्या ताब्यात; कारमधून डायरी, शर्ट आणि ५ लाखांची रोकड जप्त

Subscribe

सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार NIA ने ताब्यात घेतली आहे. या गाडीतून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कार स्वतः सचिन वाझे चालवत होते. या कार मधून पाच लाख रुपयांची रोकड, काही कपडे आणि दोन नंबरप्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती एनआयए चे आयजी अनिल शुक्ला यांनी प्रसार माध्यमांना समोर बोलताना दिली.

एनआयएच्या पथकाने मंगळवारी सीएसटी परिसरातून हस्तगत मर्सिडीज कार जप्त केली होती. या कारमधून पाच लाखा पेक्षा अधिक रक्कम आणि नोट काउंटिंग मशीन, काही कपडे आणि स्कॉर्पिओ गाडीचे दोन नंबरप्लेट जप्त करण्यात आले असल्याची माहिती एनआयए चे महासंचालक अनिल शुक्ला यांनी दिली आहे. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही मर्सिडीज कार याठिकाणी आणण्यात आली आणि एनआयए अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. दरम्यान, मर्सडीझ बेंज या गाडीचा मालक धुळे जिल्ह्याचा आहे. मात्र त्याने ती गाडी विकली होती. ती कुणाला विकली या बाबत तपास सुरू आहे.

- Advertisement -

वाझेंच्या साकेत सोसायटीचे DVR जप्त केल्याचं उघड

सचिन वाझे यांचं घर असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीमधील दोन डीव्हीआर मनसुख हिरेन यांचा मृत्यू होण्याच्या आधी जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मृतदेह मुंब्र्याच्या खाडीमध्ये सापडला. मात्र, साकेत सोसायटीमधले डीव्हीआर २७ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले आहेत. याबाबतचे पत्रव्यवहार समोर आले आहेत.


हेही वाचा – वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत खलबतं; नगराळे, परमबीर सिंह, गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -