घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्यासाठी प्लॅन केला, सदाभाऊ खोत यांचा आरोप

राष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्यासाठी प्लॅन केला, सदाभाऊ खोत यांचा आरोप

Subscribe

सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी हॉटेरचे बिल आणि उधारी प्रकरण राष्ट्रवादीचा बनाव असल्याचा आरोप केला आहे. यावेळी राष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्याचा प्लॅन केला होता, असे सदाभाऊ खोत म्हणाले पुढे त्यांनी प्लॅन काय होता हे समोर ठेवल्याचा दावा केला आहे.

सदाभाऊ खोतांनी काय आरोप केला –

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची नाचक्की होईल. म्हणून त्यांनी प्लॅनिंग केले. हॉटेल मालकाने माझ्याजवळ यायचे हॉटेलचे बिल राहिले असे बोलत रहायचे. जर त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तर हल्ला करायचा असा राष्ट्रवादीचा प्लॅन होता. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण – 

- Advertisement -

सदाभाऊ खोत एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर त्याने 2014 मधील उधारीची मागणी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदाभाऊ चपापले. मात्र, त्यांनी वेळ मारुन नेत तुझे काय असेल तर बघू म्हणून तिथून काढता पाय घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला उभे राहिले होते. त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा सांगोल्यातील मामा-भाचे हॉटेलमध्ये करण्यात आली होती. सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी स्वतः येऊन हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना कार्यकर्त्यांना जेवण द्यावे अशी विनंती केली होती. त्यानुसार अशोक शिनगारे यांनी 15 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत कार्यकर्त्यांना जेवण दिले. या 14 दिवसाच्या जेवणाचे एकूण बील 66 हजार 445 रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बिलाची नोंद असलेले एक रजिस्टरही शिनगारे यांना दाखवले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -