घरमहाराष्ट्रमी फडणवीस यांचा मोहरा मलाच राज्यसभा सदस्यत्व देणार

मी फडणवीस यांचा मोहरा मलाच राज्यसभा सदस्यत्व देणार

Subscribe

काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी? मी देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा आहे. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. फडणवीस हेच माझे मोदी आणि शहा आहेत, असे भाजपच्या कोट्यातून राज्यसभा सदस्यत्व मिळवलेले खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे. माझ्या केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे. हरलेल्या व्यक्तीचं पक्षासाठी काय योगदान? हरलेल्या व्यक्तीला भाजप मंत्री करेल असे वाटत नाही. उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

संजय काकडे यांची राज्यसभा सदस्यत्वाची टर्म मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच दुसरी टर्म मिळण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून जाणार्‍या जागेवर संजय काकडे यांनी दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याने, संजय काकडे यांनी राजेंपेक्षा आपलीच उमेदवारी कशी सरस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. संजय काकडे म्हणाले की, राज्यसभेसाठी मी पक्षाकडून इच्छुक आहे, सहयोगी म्हणून नाही. माझ्या केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे.

- Advertisement -

उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाही. काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी? मी देवेंद्र फडणवीस यांचा मोहरा आहे. उदयनराजे वंशज आहेत तर आम्हीही सुभेदार आहोत. फडणवीस हेच माझे मोदी आणि शहा आहेत, असेही संजय काकडे म्हणाले. माझ्या केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून मला भाजप राज्यसभा देणार आहे. हरलेल्या व्यक्तीचे पक्षासाठी काय योगदान? हरलेल्या व्यक्तीला भाजप मंत्री करेल असे वाटत नाही. उदयनराजे भोसले आहेत म्हणून ते सरस होऊ शकत नाहीत. काल आलेला माणूस श्रेष्ठ की मी? असा हल्लाबोल संजय काकडे यांनी केला.

सात जागांची मुदत संपणार
राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -