घरलाईफस्टाईलनोकरीला जाणाऱ्या मातांनो, आपल्या बाळाची काळजी अशी घ्या

नोकरीला जाणाऱ्या मातांनो, आपल्या बाळाची काळजी अशी घ्या

Subscribe

अशी घ्यावी बाळाची काळजी

बऱ्याचदा नवागत मातांना आपल्या बाळाची काळजी कशी घ्यावी, हे कळत नाही. तसेच सध्याच्या धकाधकीच्या जिवनात नोकरी सांभाळून बाळाला देखील वेळ द्यायचा असतो. अशा नवागत मातांसाठी काही टीप्स सांगणार आहोत यामुळे तुम्ही तुमच्या बाळाची काळजी सहजरित्या घेऊ शकता.

आईचे दूध पाजावे

- Advertisement -

बऱ्याचदा नोकरी करणाऱ्या माता ९ तास घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना आपल्या बाळाला वेळ देता येत नाही. अशावेळी आईने वेळ मिळेल त्यावेळी आपल्या बाळाला दूध पाजावे. त्यामुळे बाळाच्या शरीराला ऊब मिळते. त्याची बौद्धिक आणि शारीरिक वाढ जोमाने होते.

आंघोळ घालताना काळजी घ्यावी

- Advertisement -

बऱ्याचदा आपल्याला कळत नाही पाणी किती गरम आहे. आपल्याला कोमट वाटणारे पाणी बाळा गरम लागते. त्यामुळे बाळाला आंघोळ घालताना विशेष काळजी घ्यावी. तसेच हिवाळ्यात बाळाला आंघोळ घालताना त्याला थंडी वाजणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

तेलाने मालिश करावे

बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल तेल यांचे मिश्रण असलेल्या तेलाने बाळाला मालिश करावे. त्यामुळे बाळांची त्वचा मुलायम होते.

सुती कापडाने पुसावे

बाळाला आंघोळ घालून झाल्यानंतर त्यांचे शरीर पंचा किंवा सुती फडक्याने पुसून घ्यावे.

गरम कपडे घालावे

हिवाळ्यात बाळाला गरम कपडे घालावेत. तसेच बाळाचे हात, पाय आणि डोके कायम झाकून ठेवावे. तसेच उन्हाळ्यात सुती कपडे घालावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -