घरमहाराष्ट्रSanjay Raut: आजच्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड उरलंय का? राऊतांचा फडणवीसांवर...

Sanjay Raut: आजच्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड उरलंय का? राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

Subscribe

मुंबई: उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विरोधकांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली आहे. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. तर, देवेंद्र फडणवीसांना त्यांनी टोले लगावले आहेत. (Sanjay Raut After today s incident does the Home Minister have the face to answer Sanjay Raut s attack on Devendra Fadnavis)

राउतांची फडणवीसांवर टीका

गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात, आता गृहमंत्री फडणवीस कुठे आहेत? शिवसेना, खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबाबतच कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हा नियम आहे का? विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर विनाचौकशी त्याला फासावर लटकवलं असतं. तुमच्या जिल्ह्यात माफियांचं राज्य चाललं आहे. नागपूर, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमध्ये राजकीय स्वार्थासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठई गुन्हेगार आणि माफियांना संरक्षण दिलं जातं आहे. महाराष्ट्रातलं हे चित्र अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर उत्तर द्यायला तोंड उरलं आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

हे सगळं राजकारणासाठी सुरू…

राऊत म्हणाले, गणपत गायकवाड म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी गोळीबार केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगारच तयार होतील हे भाजपा आमदाराचं निवदेन आहे. मी वर्षभर सांगत आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुन्हेगारांच्या टोळ्यांना कसे फोन केले जात आहेत ते सांगितलं. मुंबई, पुणे, कोल्हापूर इथल्या तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढलं गेलं आहे. मी सगळ्यांची नावंही देऊ शकतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सगळं केवळ राजकारणासाठी सुरू आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

(हेही वाचा: Aaditya Thackeray : महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क; ठाकरे म्हणतात, आमच्या लढ्याला मोठे यश, मात्र…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -