घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्या देशद्रोही, INS विक्रांतसाठीचे पैसे निवडणुकीसाठी वापरले, संजय राऊतांचा मोठा आरोप

किरीट सोमय्या देशद्रोही, INS विक्रांतसाठीचे पैसे निवडणुकीसाठी वापरले, संजय राऊतांचा मोठा आरोप

Subscribe

देशाचे लढाऊ जहाज आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याची तयारी सुरु झाली होती. त्याच्यावर देशात संतापाचे वातावरण तयार झाले होते. आयएनएस विक्रांतवर एक संग्रहालय करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारला निधी देता आला नाही यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात निधी जमा करण्यासाठी आयएनएस विक्रांत वाचवा मोहिम सुरु केली होती. या मोहिमेत सोमय्यांनी ५७ ते ५८ कोटी रुपये गोळा केले होते. अनेक निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. तसेच सामान्य नागरिकांनीही निधी दिला होता. परंतु हा निधी राजभवनात जमा न करता स्वतःच्या निवडणुकीसाठी वापरला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किरीट सोमय्या देशद्रोही आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र सराकरने आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेला निधी सोमय्यांनी लाटला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांत एक मेमोरियल बनावं संग्रहालय करावे अशी मागणी करण्यात येत होती. मुंबईच्या समुद्रात ते आयएनएस विक्रांत होते महाराष्ट्र सरकारने २०० कोटी द्यावे अशी मागणी भाजप आणि अनेकाकंकडून झाली होती. दिल्लीत संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय खासदार होते. राहुल शेवाळे, आढळराव पाटील, खासदार बारणे होते. त्यात सध्याचे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्यासुद्धा होते परंतु पैसे जमा होऊ शकले नाही. बोट भंगारात जाण्याची वेळ आली होती.

- Advertisement -

जर सरकारकडून २०० कोटी जमा होत नसतील तर आम्ही पैसे जमवून देऊ, सरकारला देऊ आणि मुंबईत अनेक ठिकाणी पैसे गोळा करण्याची मोहिम सुरु केली. विमानतळ, सर्व प्रमुख रेल्वे स्टेशन चर्चगेटपासून ते अंबरनाथपर्यंत सोमय्यांचे लोक सेव्ह विक्रांत असे टी शर्ट घालून डबे फिरवायला लागले यावेळी मुंबई आणि महाराष्ट्रातील लाखो लोकांनी त्यांना पैसे दिले. त्या व्यतिरिक्त अनेक कॉर्पोरेटकडून सेव्ह विक्रांत म्हणून पैसे जमावले, ही रक्कम ५७ ते ५८ कोटी रुपये असेस अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितली आहे. सरकारला राष्ट्रीय भावना नाही, देशभक्ती नाही विक्रांतला हवे असलेले २०० कोटी रुपये राज भवनात जमा करु असे त्यांनी सांगितले आहे.

राज्यपालांच्या कार्यालयातून माझ्याकडे पत्र आले आहे. धिरेंद्र उपाध्याय नावाचे आरटीआय अधिकारी आहेत. २०१३ ते १०१५ पर्यंत विक्रांत साठी अशा प्रकारे पैसे गोळा करण्यात आले होते. ते तुमच्याकडे चेक आणि कॅश द्वारे आलेत का, राज्यपालांनी ,सांगितले अशी कोणताही निधी या कार्यालयात जमा करण्यात आले नाही. देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी गद्दारी केली असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे. ५७ कोटींची लहान रक्कम नाही. हा अकडा १०० कोटींवर असावा असा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

भाजप पदाधिकारी असलेल्या ईडीने चौकशी करावी

दरम्यान यावर आता किरीट सोमय्या म्हणतील आपला तर काय संबंधच नाही असे राऊत म्हणाले, पण आम्ही चर्चगेट स्टेशनला डब्ब्यात ५-५ हजार टाकले आहेत. आयएनएस विक्रांतसाठी मदत केली असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. नेव्ही नगरलाही मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली आहे. जर ही रक्कम राजभवनात जमा करण्यात आली नाही तर रक्कम कुठे गेली. जी रक्कम भाजपने निवडणुकीमध्ये वापरली, निकॉन इन्फ्रामध्ये वापरण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर जमा करण्यात आलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे परंतु केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील तर सीबीआय, आयकर आणि भाजपची पदाधिकारी असलेली ईडी यांनी चौकशी करावी, यामध्ये सोमय्या सोडून अनेक लोकं आहेत परंतु यामध्ये सोमय्या प्रमुख आहेत असा घणाघात राऊतांनी केला आहे.

लोकांचा राजभवनावर विश्वास होता. त्यावेळी शंकर नारायण नावाचे राज्यपाल होते. राजभवनाच्या नावावर पैसे गोळा केले आहे. राष्ट्रीय भावनेशी खेळण्याचा हा प्रयत्न झाला आहे. सोमय्या भाजपचा नेता आहे. केंद्रीय सुरक्षा व्यवस्था दिली असेल तर केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेची खेळणाऱ्या राष्ट्रद्रोही व्यक्तीला सुरक्षा दिली आहे. अनेक निवृत्त जवान आणि नेव्ही अधिकारी अस्वस्थ आहेत. आम्ही त्यांनाही पैसे दिले आहेत. विक्रांतवर काम करणाऱ्या नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी त्या डब्ब्यात ५०-५० हजार रुपये दिले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा : Corona virus: कोरोनाचे आणखी एक नवीन लक्षण; WHOनं दिला इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -