घरमहाराष्ट्ररुग्णांच्या मृत्यूवरून संजय राऊतांची सरकारवर सडकून टीका, म्हणाले - "यांचा काय सत्कार...

रुग्णांच्या मृत्यूवरून संजय राऊतांची सरकारवर सडकून टीका, म्हणाले – “यांचा काय सत्कार करायचा का?”

Subscribe

राज्यात सुरू असलेल्या रुग्णालयातील मृत्यू तांडवावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा रुग्णालयात 18 रुग्णांच्या अचानक मृत्यून खळबळ उडाली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे तांडव इतक्यावरच थांबले नाही तर ही घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा काही तासांमध्ये आणखी 7 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या रुग्णालयातील मृतांचा आकडा हा 31 वर पोहोचला. यामध्ये एकूण 16 लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना ताजी असताना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातही 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता नागपुरातील शासकीय रुग्णालयात देखील रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यात सुरू असलेल्या रुग्णालयातील मृत्यू तांडवावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. (Sanjay Raut criticizes the government over the death of patients in government Hospital)

हेही वाचा – रुग्णालयात दाखल व्हावे आणि… वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा आधार घेत सचिन सावंतांचा निशाणा

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी रुग्णांच्या मृत्यूवरून सरकारवर टीकास्त्र डागत म्हटले की, महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरू आहे. असे असताना राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना त्यांची चिंता नाही. सरकारमधील सर्व जण राजकारणात अडकलेले आहेत. कोणाला पालकमंत्री व्हायचे आहे, कोणाला खाते बदलून हवे आहे, अशातच ते अडकले आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी लोकांचा आक्रोश पाहा… याकडे सरकारचे लक्ष नाही. यांचा काय सत्कार करायचा का?, अशा कठोर शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र हे आजारी राज्य होत चालले आहे. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र आजारी झाला आहे. या लोकांनी महाराष्ट्राला आजारी राज्य बनवले आहे, जे बरोबर नाही, असे मत संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच, हे खुनी सरकार आहे हे मी कशाला बोलायला पाहिजे. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजी नगरला जाऊन आक्रोश पाहा, मग कळेल. त्यामुळे हे सरकार खुनी नाही तर काय? असा घणाघात संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण हे तापलेले पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू हा औषधांच्या तुटवड्यामुळे झाल्याचा आरोप हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला होता. ज्यानंतर विरोधकांनी हा विषय उचलून धरला. पण काल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्याकडून देखील औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेशी औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -