घरमहाराष्ट्रSanjay Raut : आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची, राऊतांनी काँग्रेसला का...

Sanjay Raut : आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची, राऊतांनी काँग्रेसला का दिला इशारा?

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलेल्या इशाऱ्यामुळे मविआत नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगलीतील उमेदवार परस्पर जाहीर केल्याने संजय राऊतांनी आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या असल्या तरी, अद्यापही राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. पण जागावाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात असून मविआकडून लवकरच याची घोषमाणा करण्यात येणार असल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलेल्या इशाऱ्यामुळे मविआत नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगलीतील उमेदवार परस्पर जाहीर केल्याने संजय राऊतांनी आमची तयारी एक पाऊल पुढे जाण्याची असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut gave warning after Nana Patole declared Congress candidate from Sangli Lok Sabha)

हेही वाचा… Sanjay Raut : …तर ते महाराष्ट्रविरोधी, राऊतांकडून मनसेची एमआयएमसोबत तुलना

- Advertisement -

आज (ता. 19 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार जाहीर केला असल्याबाबतचा प्रश्न विचारला असता, याबाबत ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या संदर्भातील निर्णय हा नेहरू सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यावेळी मविआचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे दिल्लीतील पाच नेते या बैठकीत होते, त्यामुळे या बैठकीत जागा वाटपासंदर्भातील काही निर्णय घेण्यात आले आहेत आणि त्यानुसार ते जागा वाटप झालेले आहे. पण त्यानंतरही कोणी काही भूमिका घेत असेल तर त्यावर व्यक्त होणार नाही. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी संयमाने बोलले पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे. पण आमची एक पाऊल पुढे जाण्याची तयारी आहे, असे म्हणत राऊतांकडून काँग्रेसला इशारा देण्यात आला आहे.

तसेच, नाना पटोलेंनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली असली तरी सांगली लोकसभेची जागा ही ठाकरे गटासाठी सुटली आहे. पण तरी देखील कोणालाही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपाला सांगली लोकसभेत मदत करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. तसेच भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येईल, अशी ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका असल्याचे राऊतांकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून कोणतेही अल्टिमेटम देण्यात आले नसल्याचा दावाही राऊतांकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -