घरमनोरंजनदिशा पटानी आणि टायगर श्रॉफचा व्हायरल व्हिडीओ पाहून युझर्सने उडवली खिल्ली

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचा व्हायरल व्हिडीओ पाहून युझर्सने उडवली खिल्ली

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशा तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशा तिच्या लूक्सशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते. टायगर श्रॉफसोबतच्या अफेअर आणि बेक्रअपमुळे देखील दिशा एकेकाळी चर्चेत राहिली होती. दरम्यान, अशातच आता टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा एकत्र दिसत आहेत. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र येण्याची विनंती करत आहेत.

दिशा-टायगर दिसले एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. पण जेव्हा त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली तेव्हा त्यांचे चाहते नाराज झाले होते. पण याचदरम्यान दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ इतर कलाकारांना भेटताना दिसत आहे. त्यानंतर पुढे दिशा दिसताच त्याने मिला मिठी मारली आणि तिथून तो पुढे निघून गेला यावेळी दिशा त्याला काहीतरी सांगते पण दुर्लक्ष करुन टायगर तिथून निघून जातो.

- Advertisement -

हा व्हिडीओ पाहताच अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युझरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “दिशा टायगरला खाली जमिनीवर बसायला सांगतेय”, तर दुसऱ्या युझरने लिहिलंय की, “टायगर दिशाकडे दुर्लक्ष करतोय, भावाने ब्रेकअपला गंभीरपणे घेतले आहे.”

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मुळे टायगर चर्चेत

सध्या टायगर श्रॉफ त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेय यामध्ये अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : ‘मडगाव एक्स्प्रेस’च्या टीमला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -