घरमहाराष्ट्रSanjay Raut : '2024 नंतर नाटकं-एकांकिकाच करायच्या'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे...

Sanjay Raut : ‘2024 नंतर नाटकं-एकांकिकाच करायच्या’; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय नाट्य समंलनाच्या कार्यक्रमात बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टोला लगावला. फडणवसांनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या. त्यांना 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचंय. दुसरं काम काय त्यांना? मानेचा पट्टा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाहाही आजारी असतात. मोदीही आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा घातलेला आहे आणि दिल्ली तो पट्टा खेळवत बसली आहे”, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… Parle Mahotsav : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन; 32 प्रकारच्या स्पर्धा होणार

महाविकास आघाडीच्या बैठका दिल्लीत होत असतात त्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीक करण्यात आली होती. यावर बोलताना राऊत यांनी शिंदे गट आणि अजित पवर गटाला टोला लगावला. भाजपा, शिंदे गट, आजित पवार गट यांचं हायकमांड दिल्लीमध्ये आहे. शिवसेनेचं हायकमांड मुंबईत आहे. एकनाथ शिंदे गटाचे हायकमांड हे अमित शाह आहेत, मोदी किंवा जे.पी नड्डा आहेत. त्याचप्रमाणे अजित पवार यांना महायुतीत चर्चा करायची असेल तर त्यांना दिल्लीत अमित शाह, मोदींना भेटावं लागेल. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यांना वारंवार एकेका जागेसाठी दिल्लीत जावं लागू नये, यासाठी आम्ही त्यांची सोय पाहातोय. असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… Hit and Run Law : …तर गुन्हा रद्द होऊ शकतो का? संजय राऊत यांचा भाजपाला चिमटा

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले आहेत की, विरोधकांनी गैरव्यवहार झाल्याचा पुरावा द्यावा. कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल. फडणवीसांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी Evidence Act चा अभ्यास करावा. पुराव्याची व्याख्या द्यांनी काही बनवली आहे का? देशाचं सविधान बदल आहे का? पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? विरोधी पक्ष नेते पुरावे देत आहेत.त्यांना अजून काय पुरावे हवे आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -