घरताज्या घडामोडी"वेट अँड वॉच" संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सूचक विधान

“वेट अँड वॉच” संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सूचक विधान

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत राऊतांना विचारण्यात आले. भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली. काल आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ वेट अँड वॉच अशी सूचक प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. परंतु राऊतांनी अद्याप कागदपत्रे किंवा पुरावे दिले नाही. राऊतांनी पत्रकार परिषदेनंतर तीनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर गुरुवारी दिवसभरात दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडी आणि शिवेसना कागद पत्रे आणि पुराव्यांच्याबाबात पक्की असल्याचे विधान संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ वेट अँड वॉच अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.

शिवसेना खसादर संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र दोघे तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य केलय. परंतु त्यांच्याबाबत अद्याप पुरावा दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांना सोमय्यांविरोधातील पुरावे कधी प्रसिद्ध करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी, शिवसेना कागदपत्रांच्या बाबतीत पक्के आणि ठाम आहे. येणाऱ्या काळात सगळ्यांनाच कळेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत राऊतांना विचारण्यात आले. भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली. काल आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ वेट अँड वॉच अशी सूचक प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

सोमय्यांनी साडे सात हजार कोटी गोळा केले

शिवसेना खासदास संजय राऊत आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोपांची मालिका सुरुच आहे. किरीट सोमय्या आरोप करुन माध्यमांसमोर कागदपत्रे सादर करत असतात. परंतु संजय राऊत यांनी आरोप केले असून त्यांनी कोणतेही कागदपत्रे दिली नाही. तर आज पुन्हा राऊतांनी सोमय्यांवर आरोप केले आहे. सोमय्यांचे रोज एक भ्रष्टाचाराचे प्रकरण मी बाहेर काढणार आहे. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोर येऊन किरीट सोमय्यांची २११ प्रकरणे दिली आहेत. आणि या एकूण घोटाळ्यात गेल्या काही वर्षात किरीट सोमय्यांनी साडे सात हजार कोटी रुपये गोळा केले आहेत.’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Raut VS Kirit Somaiya: माझ्याकडे सोमय्यांची २११ प्रकरणे, रोज एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढणार – संजय राऊत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -