घरताज्या घडामोडीSanjay Raut : ट्विटर, फेसबूकवरून जागावाटपाची चर्चा होत नाही; राऊतांचा आंबेडकरांना टोला

Sanjay Raut : ट्विटर, फेसबूकवरून जागावाटपाची चर्चा होत नाही; राऊतांचा आंबेडकरांना टोला

Subscribe

समाज माध्यमातून, ट्विटरवरून, फेसबूकवरून कोणत्याही आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधीही केली नाही आणि करतही नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.

मुंबई : समाज माध्यमातून, ट्विटरवरून, फेसबूकवरून कोणत्याही आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधीही केली नाही आणि करतही नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपावरून वंचित आणि मविआतील धुसपूस सुरूच आहेत. (sanjay raut slams vanchit bahujan aghadi president prakash ambedkar)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे सदस्य आहेत. पहिल्या मिटींगमध्ये प्रकाश आंबेडकर आले होते. पण आज जी बैठक होत आहे ती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होणार आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीला एक प्रस्ताव दिला. चार जागांचा प्रस्ताव आम्ही वंचितला दिला असून, त्यांना त्यावर विचार करायचा आहे. त्यांनी आमच्याकडे ज्या चार जागा मागितल्या होत्या त्या जागांचा प्रस्तावर त्यांना दिला असून त्यांनी त्यावर चर्चा करणे गरजेचे आहे. पण त्यांचीच जर त्या प्रस्तावर चर्चा झाली नसेल तर, आम्ही का चर्चा करायची. पण प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय, “महाविकास आघाडीमध्ये कोणीच कोणाला पाडणार नाही. हे पाडापाडीचे भूत कोणाच्या मानगुटीवर का बसतंय ते आम्हाल माहीत नाही. आम्हाला भाजपला आणि हुकुमशाहीला पाडायचं आहे, हे प्रकाश आंबेडकर यांनी माहीत आहे. त्यामुळे आजची बैठक ही महाविकास आघाडी म्हणून होत नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही जागांवरून चर्चा होता आहे. तसेच, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून चर्चा बाकी आहेत, त्या चर्चा होत आहेत. या चर्चा एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात चर्चा करायची झाली तर, व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे करू. वंचित बहुजन आघाडीसमोर आम्ही चार जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्या 27 जागांची यादी त्यांनी दिली होती. त्यातील चार जागांचा आम्ही त्यांना प्रस्ताव दिला आहे. त्याच चार जागांवर वंचितच्या नेत्यांनी निर्णय घेऊन त्या जागांवर त्यांची भूमिका काय आहे, हे आम्हाला कळवायचं आहे. त्यामुळे याच बोलवण्याचा आणि न बोलवण्याचा मानसन्मानाचा प्रश्नच येत नाही. आम्ही कोणाला निमंत्रण देऊन बोलवत नाही. महाविकास आघाडी एक कुटुंब आहे. प्रत्येकजण कधीही त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकतो”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

“समाज माध्यमातून, ट्विटरवरून, फेसबूकवरून कोणत्याही आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधीही केली नाही आणि करतही नाही. आमच्यात कोणताही बैठकींचा सिलसिला सुरू नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bonds : इलेक्टोरल बॉण्ड्स खरेदी-विक्रीवरून संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -