घरमहाराष्ट्रफोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांना समन्स, कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवणार

फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांना समन्स, कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवणार

Subscribe

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल झालेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबईतील कुलाबा पोलिसांना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असताना त्यांचा फोनही टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे.

मुंबईः Phone Tapping Case: गोवा विधानसभा निवडणुकीत फोन टॅपिंगचा आरोप करणारे शिवसेना नेते संजय राऊत आज पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहेत. संजय राऊत यांचा फोनही टॅप करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलाय. मुंबईतील कुलाबा पोलिसांनी संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. त्याअंतर्गत आता संजय राऊत यांना पोलिसांसमोर हजर राहून जबाब नोंदवावा लागणार आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल झालेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबईतील कुलाबा पोलिसांना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असताना त्यांचा फोनही टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राऊत हे या प्रकरणातील पीडित असून, त्यांचा जबाब नोंदवून मुंबई पोलिसांना हे प्रकरण थोडे समजून घ्यायचे आहे, त्यामुळेच त्यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

कालच कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवला असून, खडसेंच्या चौकशीदरम्यान शुक्ला यांनी खडसेंचा फोनच टॅप केला नाही तर त्यांचा सहाय्यक आणि त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याचाही फोन टॅप केल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कधी कधी मोठे नेते व्यस्त असतात, अशा परिस्थितीत लोक त्यांच्या सहाय्यकांना बोलावतात. या दोघांचे फोन टॅप करून त्यांच्यात सुरू असलेले संभाषण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

आरोपांच्या प्रकारानुसार, महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार स्थापन होण्यापूर्वी राऊत आणि खडसे यांचे फोन दोनदा टॅप झाले असून, कुलाबा पोलिसांकडून याच गोष्टीचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रश्मी शुक्ला यांचा पोलिसांत दोनदा जबाब नोंदवण्यात आला आहे. शुक्ला तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी केला असून, गरज भासल्यास त्यांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाऊ शकते. यापूर्वी गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

- Advertisement -

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मार्चमध्ये कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरुद्ध भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. शुक्ला यांनी भाजपचे माजी नेते खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन नंबर वॉचलिस्टमध्ये टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

2019 मध्ये खडसेंचा फोन दोनदा टॅप झाला होता

शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) प्रमुख असताना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तक्रारीनुसार, 2019 मध्ये खडसेंचा फोन दोनदा टॅप करण्यात आला होता. जेव्हा ते भाजपसोबत होते. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

तक्रारीच्या आधारे शुक्लाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्या व्यतिरिक्त शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोनही (नोव्हेंबर 2019 मध्ये) महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेदरम्यान टॅप करण्यात आला होता. ते म्हणाले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचाः शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -