घरलाईफस्टाईलrecipe: कुरकुरीत मेथीचे शंकरपाळे

recipe: कुरकुरीत मेथीचे शंकरपाळे

Subscribe

आज काय बनवायचे असा प्रश्न रोज पडतो. कारण सर्वांची आवड वेगवेगळी असल्याने नेमक काय बनवायच असे प्रश्न अनेकांना पडतो. स्वयंपाक करणे ही एक कला आहे. वेगवेगळ्या चवीचे रूचकर पदार्थ करणे ही मोठी कला आहे.

महिलांना जेवणात काय बनवायचे असा प्रश्न रोज पडतो. कारण सर्वांची आवड वेगवेगळी असते तसेच नाश्त्यात आणि जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळलेली असतात.  म्हणून आज एक नवीन आणि वेगळ्या पदार्थाची रेसीपी      आम्ही घेऊन आलो आहोत . हा पदार्थ म्हणजे मेथीचे शंकरपाळे आहे. तर चला जाणून घेऊया या पदार्थाची रेसिपी.

सामग्री

- Advertisement -

3/4 वाटी गव्हाचे पीठ
1/4 वाटी मैदा
1 चमचा तेल
2 चमचा कसूरी मेथी
2 चिमूट ओवा
मीठ चवीनूसार
तेल

कृती

- Advertisement -

मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ घालून ते मिक्स करून घ्या. त्यामध्ये 1चमचा गरम केलेले तेल घालायचे आहे.
कसूरी मेथीची चुरडून पावडर बनवून पिठामध्ये घालावी आणि ओवा मिक्स करून घ्यायचे. नंतर ते पाण्याने घट्ट भिजवून ते 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे.
15 मिनिटांनी मळलेल्या पीठाचे दोन समान भाग करून घ्यायचे.
1 पिठाचा गोळा पातळ लाटून तो सुकू नये म्हणून झाकून ठेवावा.
दुसऱ्या पिठाच्या गोळ्याची पोळी लाटून घ्या.
आता त्याच्यावरच्या बाजुला तेल लावून झाकलेली पोळी त्यावर ठेवायची आहे.
दोन्ही पोळ्या एकमेकांनावर ठेवून चिकण्यासाठी थोडे लाटून घ्यायचे आहे.
कातणाने शंकरपाळ्याला आकारात कापून घ्यायच्या आहेत
तेलामध्ये मध्यम आचेवर कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -