घरमहाराष्ट्रSanjay Raut यांचा दत्ता दळवी प्रकरणावरून गंभीर आरोप; म्हणाले, "पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर...

Sanjay Raut यांचा दत्ता दळवी प्रकरणावरून गंभीर आरोप; म्हणाले, “पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दबाव”

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी गेल्या दोन रात्रीपासून ठाण्यातील तुरुंगात आहेत. शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी (ता. 26 नोव्हेंबर) भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदुह्रदयसम्राट या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबदद्ल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153 (अ), 153 (ब), 153 (अ), सी, 294, 504, 505 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली. यानंतर ठाकरे गटाकडून तातडीने दळवी यांना जामीन मिळावा, याकरिता धावपळ करण्यात आली. परंतु, दोन दिवस झाले असले तरी दळवी यांना जामीन मिळू शकलेला नाही. यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. (Sanjay Raut’s serious allegations in the Datta Dalvi case)

हेही वाचा – Sanjay Raut : Exit Poll मुळे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्यांना फुटला घाम, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisement -

ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्या जामीनावर आज (ता. 01 डिसेंबर) सुनावणी करण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार असलेले संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रसार माध्यमांशी याबाबत राऊत म्हणाले की, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर यांच्यावर दबाव आणून ज्या गुन्ह्यांमध्ये सरळ जामीन मिळू शकतो, अशा गुन्ह्यांमध्येही राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचे आणि आमच्याकडे सत्ता आहे असे सांगायचे. पण आम्ही ही सत्ता राजकीय विरोधकांच्या विरोधात कशी वापरू शकतो, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिसांनी स्वतःची बाजू न्यायालयात वेळेत मांडू नये म्हणून दबाव टाकला जात आहे. तर या ना त्या मार्गाने न्यायालयावर दबाव असे करुन कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचे. काही हरकत नाही ठेवा तुम्ही, 2024 पासून उलटे चक्र सुरू होईल. तेव्हा तुम्ही मग प्रश्न विचारू नका. तुम्ही जो मार्ग स्विकारत आहात. त्या मार्गाने आम्हाला देखील जाता येईल. सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करून असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

यावेळी राऊतांनी पाच राज्यांच्या निवडणुकांवरूनही भाजपावर हल्लाबोल केला. याबाबत ते म्हणाले की, ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल याच्यावर चर्चा करण्यापेक्षा 3 डिसेंबरला जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागतील. त्यावर आपण बोललेले बरे. पण या पाच राज्यात जे परिवर्तन होणार असे सांगण्यात येत आहे. त्या परिवर्तनाची दिशा ही 2024 ला दिल्लीतून सत्ता परिवर्तनाच्या दिशेने जाणारी आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसने सर्व राज्यात वादळ निर्माण केले ती 2024 च्या परिवर्तनाची झलक आहे. त्यामुळे आता कोण कोणत्या राज्यात जिंकेल किंवा जी काही अटीतटीची लढत होणार असे सांगितले जात आहे ते महत्त्वाचे आहे. भाजपाने 2014 पासून काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. पण आता त्या काँग्रेसने, राहुल गांधींनी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -