घरAssembly Session LiveSanjay Raut : Exit Poll मुळे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्यांना फुटला घाम, राऊतांचा...

Sanjay Raut : Exit Poll मुळे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्यांना फुटला घाम, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना एक्झिट पोलमुळे घाम फुटल्याचे म्हणत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई : देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे वारे आहेत. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील मतदान पार पडले असून रविवारी 03 डिसेंबरला या पाचही राज्यांच्या मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे. विविध सर्वेक्षण कंपन्यांकडून याबाबतचा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या पाच राज्यांची निवडणूक ही लोकसभेसाठीची उपांत्य फेरी म्हणजेच लोकसभेची सेमी फायनल मानली जात आहे. ज्यामुळे या पाचही राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले आहे. परंतु, सर्वेक्षण अहवालानुसार, पाचपैकी तीन राज्यांत काँग्रेसला आपली सत्ता स्थापन करता येणार आहे. तर मिझोराम राज्यांत प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व असले तरी या राज्यात सुद्धा काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षाची सत्ता येणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तर राजस्थानात गेल्या 25 वर्षांची सत्ता बदलाची परंपरा कायम राहणार असून यंदाच्या वर्षी भाजपाचे कमळ फुलणार आहे. पंरतु, राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना एक्झिट पोलमुळे घाम फुटल्याचे म्हणत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut: Exit Poll has made those who want Congress-free India sweat)

हेही वाचा – Rajasthan Assembly Elections : मतदार राजस्थानात परंपरा कायम ठेवणार? सर्वेक्षणानुसार भाजपाची सत्ता

- Advertisement -

प्रसार माध्यमांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, ज्या पाच राज्यांत निवडणुका झाल्या ती पाच राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल याच्यावर चर्चा करण्यापेक्षा 3 डिसेंबरला जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागतील. त्यावर आपण बोललेले बरे. पण या पाच राज्यात जे परिवर्तन होणार असे सांगण्यात येत आहे. त्या परिवर्तनाची दिशा ही 2024 ला दिल्लीतून सत्ता परिवर्तनाच्या दिशेने जाणारी आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसने सर्व राज्यात वादळ निर्माण केले ती 2024 च्या परिवर्तनाची झलक आहे. त्यामुळे आता कोण कोणत्या राज्यात जिंकेल किंवा जी काही अटीतटीची लढत होणार असे सांगितले जात आहे ते महत्त्वाचे आहे. भाजपाने 2014 पासून काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. पण आता त्या काँग्रेसने, राहुल गांधींनी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

तर, देशाच्या पंतप्रधानांना आठ आठ दिवस एका राज्यात राहावे लागत आहे. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फिरावे लागत आहे. हे काँग्रेसमुक्त भारताचे लक्ष नसून यांच्यापासून (भाजपापासून) भारताला मुक्ती मिळणार त्याची ही हवा आहे. मला पूर्ण खात्री आहे की, राजस्थाऩसह चारही राज्यांत काँग्रेसचे सरकार बनेल, म्हणजेच इंडिया आघाडीचे सरकार बनेल. मिझोराममध्ये सुद्धा प्रादेशिक पक्षासोबत काँग्रेस सत्तेत येईल. काँग्रेसचे चांगले दिवस आले आहेत. काँग्रेसचा विजय हा इंडिया आघाडीचा विजय आहे. इंडिया आघाडीतील कोणतेही पक्ष निवडणुकीत नसले तरी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने हे इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचे असल्याचे मत संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -