घरमहाराष्ट्र... तरीही शिवसेना सोडणार नाही, ईडी छाप्यावर संजय राऊतांचे ट्वीट

… तरीही शिवसेना सोडणार नाही, ईडी छाप्यावर संजय राऊतांचे ट्वीट

Subscribe

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळीच राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराबाहेर CISF चा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये काय? –

- Advertisement -

यातील पहिल्या ट्वटिमध्ये त्यांनी शिवसेनेचे चीन्ह धनुष्यबानाचा फोटो दीला असून त्या सोबत त्यांनी तरीही शिवसेना सोडणार नाही.. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. तर पुढे त्यांनी कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असे म्हटले आहे.

- Advertisement -

आतापर्यंतची संजय राऊतांवरील ईडी कारवाई –

गुरु आशिष कंन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरू आहे. प्रवीण राऊत हे या कंपनीचे माजी संचालक आहेत.  13 मार्च 2018 साली करण्यात आलेल्या तक्रारीनुसार राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि इतरांविरोधीत आरोप करण्यात आले होते. एफआयआर नं. 22/2018 नुसार ईडीनं याप्रकरणी तपास आणि चौकशी केली होती. या कारवाईत  प्रवीण राऊतांच्या पालघर, सफाळे, पडगा येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर वर्षा राऊत यांचे दादारमधील घर तसेच  वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांनी एकत्रित खरेदी केलेल्या किहिम किनाऱ्यावरील प्लॉट्स जप्त करण्यात आले आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -