घरदेश-विदेशनेपाळच्या काठमांडू आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

नेपाळच्या काठमांडू आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

Subscribe

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, सकाळी 7.58 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप इतका तीव्र होता की, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला. त्यांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोक सांगतात.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक घरीच होते. अशा स्थितीत सकाळी भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, सुदैवाने भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

- Advertisement -

भूकंप का होतात जाणून घ्या? –

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50 किमी जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी कंपन करत राहतात आणि जेव्हा ही प्लेट खूप कंपन करते तेव्हा भूकंप जाणवतो.

- Advertisement -

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्या? –

भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वी थरथरू लागते. या ठिकाणी किंवा आसपासच्या भागात भूकंपाचा प्रभाव अधिक असतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर आजूबाजूच्या 40 किमीच्या त्रिज्येत हा हादरा अधिक तीव्र असतो.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -