घरमहाराष्ट्रसंजय राऊत को हिसाब तो देना पडेगा, किरीट सोमय्यांचे ट्विट

संजय राऊत को हिसाब तो देना पडेगा, किरीट सोमय्यांचे ट्विट

Subscribe

गोरेगावच्या 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा जाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊतांच्या घरी छापा मारला आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी सकाळी सीआरपीएफ जवानांसह दाकळ झाले आहेत. राऊत यांच्या घराची झडती सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. दरम्यान संजय राऊत यांची चौकशीही होणार आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत ट्विट त्यांनी केले आहे.

संजय राऊत को हिसाब तो देना पड़ेगा  –

- Advertisement -

संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले. राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचे सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना आतही टाकले आहे. पत्राचाळमध्ये 1200 कोटींचा घोटाळा झाला. त्यासोबत नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचे आहे. मलिकांच्या शेजारी राऊतांची जागा व्हायला हवी असे महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. हे राऊत धमक्या देत होते. पळापळ करत होते. हिशोब देत नव्हते. आता त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

मीच मीडियाला पुरावे दिले –

- Advertisement -

पुढे त्यांनी पत्राचाळ प्रकरणी मीच मीडियाला पुरावे दिले आहेत. जिथे तक्रारी केल्या. त्यांनाही पुरावे दिले. राऊतांच्या विदेशवाऱ्या व्हायच्या, कुटुंबासह परदेशात जायचे. विमानाचे तिकीट, हॉटेलची बिले कोण देत होते? प्रवीण राऊत आणि बाकीच्यांचे संबंध कशा प्रकारे आहेत? हिशोब तर द्यावेच लागतात, असे सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांनी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असे सांगीतले.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -