घरताज्या घडामोडीज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन

Subscribe

विनोदी कथा संग्रह,कादंबरी, आत्मचरित्र लिहिण्यात त्यांचा हातखंड होता.

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन झाले. ( senior writer Chandrakant Mahamine is passed away)  एक प्रसिद्ध मराठी लेखक म्हणून चंद्रकांत महामिने यांची ओळख होती.  विनोदी कथा संग्रह,कादंबरी, आत्मचरित्र लिहिण्यात त्यांचा हातखंड होता. चंद्रकांत महामिने यांनी नाशिक जिल्ह्यातील अभोणा गावात १९ नोव्हेंबर २०११ रोजी सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याचप्रमाणे नाशिकमधील सातपूर गावात २० नोव्हेंबर २०१० रोजी भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे देखीलअध्यक्षपद भूषवले होते.

चंद्रकांत महामिने यांची प्रसिद्ध पुस्तके 

  • आपल्याच बापाचा माल (विनोदी कथांचा संग्रह)
  • एक दिवसाचा मुख्यमंत्री (कथासंग्रह)
  • कोंडवाडा (कादंबरी)
  • गंगाराम गांगरेच्या गमती (बालसाहित्य, विनोदी)
  • गंगू आली रे अंगणी (कथासंग्रह)
  • खानावळ ते लिहिणावळ (आत्मचरित्र)
  • तिसरी पिढी (कादंवरी)
  • प्रवराकाठची माणसं (कथासंग्रह)
  • मदनबाधा
  • मराठीने केला बिहारी भ्रतार (कथासंग्रह)
  • साहित्य पालखीचे बेरके भोई (विनोदी लेख)
  • सिडको ते सिडनी (विनोदी)

हेही वाचा – सनईवादक बिस्मिल्ला खाँ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -