घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात भरधाव एसटीची सात वाहनांना धडक, आठ वर्षांच्या मुलासह सहा जण जखमी

पुण्यात भरधाव एसटीची सात वाहनांना धडक, आठ वर्षांच्या मुलासह सहा जण जखमी

Subscribe

पुण्यातील पिरंगुट घाटात घडलेली अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुणे शहरात एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीच्या वेळी पुण्यातील फातिमानगर भागांत भरधाव एसटी बसने सात वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : पुण्यातील पिरंगुट घाटात घडलेली अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुणे शहरात एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (ता. 21 नोव्हेंबर) रात्रीच्या वेळी पुण्यातील फातिमानगर भागांत भरधाव एसटी बसने सात वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकूण सात जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका आठ वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एसटी बसचालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात ही घटना घडली आहे. (Seven people were injured in a collision with a vehicle by a speeding ST bus in Pune)

हेही वाचा – महाबळेश्वरमध्ये पर्यटकासह घोडा दरीत कोसळला अन् थरारक…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या एसटी बसने वाहनांना धडक दिली. ती बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. त्यावेळी फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. तर वानवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एसटी बसचालकाला ताब्यात घेतले. काल रात्री उशिरा वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तर, चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एसटी बसचालकाचे नाव आहे.

ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पुण्यातील हडपसर रस्त्यावर कायमच वर्दळ असत. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते आणि याच वर्दळीच्या वेळी हा अपघात झाला. या अपघातामध्ये काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्यचाी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

या घटनेच्या काही तास आधीच पुण्यातीलच पिरंगुट घाटात एका टेम्पोने सहा वाहनांना धडक दिली होती. त्या अपघातात देखील सात जण जखमी झाले होते. सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सात जण जखमी झाले. या घटनेत जी व्यक्ती गंभीर जखमी झाली होती, ती डॉक्टर असल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. ज्यामुळे या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात धडकी भरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -