घरताज्या घडामोडीशिंदे हे ठाण्यापुरता... अनिल बोंडेंच्या वक्तव्यानंतर शंभुराज देसाई भडकले

शिंदे हे ठाण्यापुरता… अनिल बोंडेंच्या वक्तव्यानंतर शंभुराज देसाई भडकले

Subscribe

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीने मंगळवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या जाहिरातीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम स्थान दिल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र, या जाहिरातीवरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं म्हणत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पलटवार केला आहे.

शिंदे हे ठाण्यापुरता…

काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं स्टेटमेंट ऐकलं आहे. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका घेतील. कालची जाहिरात ही शिवसेना पक्षाची अधिकृत जाहिरात नव्हती. आज आलेली जाहिरात ही शिवसेना पक्षाची अधिकृत जाहिरात आहे. ऐवढी समजूतदारपणाची भूमिका आम्ही घेत असताना खासदार अनिल बोंडे हे विविध प्रकारच्या उपमा देत असतील, तर आम्ही अजून सुद्धा संयम पाळतो. परंतु शिंदे हे ठाण्यापुरता आहेत की महाराष्ट्रापुरता? यावर आम्ही उठाव केला. जर एका नेत्याच्या पाठीमागे ५० आमदार, १३ खासदार असतील तर तो नेता नुसता राज्यापुरताच नाही तर देशामध्ये त्यांची नोंद घेण्यात आली, असं मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

अशा प्रकारची वक्तव्यं करणं योग्य नाही

हा विषय मला वाढवायचा नाही. पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारची वक्तव्यं करणं योग्य नाही. कारण सामांजस्याची भूमिका दोघांकडून घेण्यात आली आहे. आमचा त्या जाहिरातीशी थेट संबंध नाही. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला पाहिजे, असंही शंभुराज देसाई म्हणाले.

काय म्हणाले अनिल बोंडे?

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदरणीय मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्ष आणि जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. परंतु त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे. उद्धव ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. तसेच शिंदेंना सुद्धा असंच वाटतंय की, ठाणे म्हणजे महाराष्ट्र आहे, असं खासदार अनिल बोंडे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील जनतेसमोर देवेंद्र फडणवीस असा चेहरा आहे. जो चेहरा बहुजनांसाठी काम करतो. ओबीसी, मराठा आरक्षण, धनगर समाज किंवा आदिवासी कल्याण समाज आणि अनुसूचित जाती-जमातींना न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, असं अनिल बोंडे म्हणाले.

मी काल पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात होतो. प्रत्येक ठिकाणी आणि खेड्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे हा सर्व्हे कुणी केला? हा सर्व्हे ठाण्यापुरताच मर्यादित होता की महाराष्ट्रापुरता? असे अनेक सवाल अनिल बोंडेंनी उपस्थित केले आहेत.


हेही वाचा : शिवसेनेच्या नव्या जाहिरातीत बाळासाहेब, फडणवीसांचा फोटो; मुख्यमंत्र्यांच्या पसंतीची टक्केवारीच वगळली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -