घरताज्या घडामोडीगोरेंच्या घातपाताची शक्यता बिलकुल वाटत नाही कदाचित... शंभूराज देसाईंची माहिती

गोरेंच्या घातपाताची शक्यता बिलकुल वाटत नाही कदाचित… शंभूराज देसाईंची माहिती

Subscribe

साताऱ्यातील माण खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत, तर त्यांच्या चालक आणि अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात जयकुमार गोरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोरे यांच्या छातीला दुखापत झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जयकुमार गोरे यांची प्रकृती चांगली आहे. परंतु गोरेंच्या घातपाताची शक्यता बिलकुल वाटत नाही, असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

शंभूराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जयकुमार गोरेंची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. गोरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन संभाषणही झालं. जयकुमार गोरे यांना फलटणमध्ये प्राथमिक उपचार चांगले मिळाले. त्यामुळे त्यांच्या काळजीचं काहीही कारण नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

गोरेंच्या घातपाताची शक्यता बिलकुल वाटत नाही. कदाचित बोलण्याच्या ओघात किंवा अनावधानाने झालं असेल, परंतु तसं काही नाही. मुळात ते स्वत: गाडीत झोपमध्ये होते, असंही शंभूराज देसाई म्हणाले. दरम्यान, शंभूराज देसाई पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जयकुमार गोरेंची विचारपूस केली.

आमदार गोरेंच्या अपघाताची माहिती मिळताच रुबी हॉल रुग्णालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र गोरे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी करु नये, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा : आमदार गोरेंच्या छातीला दुखापत, मात्र प्रकृती स्थिर, रुबी रुग्णालयातील डॉक्टरांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -