घरमहाराष्ट्रनागपूरब्राह्मणांनी पापक्षालन करावं का? ब्राह्मण महासंघाचा आक्षेप तर शरद पवारांची भूमिका काय?

ब्राह्मणांनी पापक्षालन करावं का? ब्राह्मण महासंघाचा आक्षेप तर शरद पवारांची भूमिका काय?

Subscribe

मुंबई – ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत असून आता ब्राह्मण महासंघानेही भगवंतांच्या या विधानावर टीका केली आहे. तर, शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे भागवंतांच्या वक्तव्याचं समर्थनच केलं आहे.

“मोहन भागवंतांचं वक्तव्य चुकीचं आणि पूर्ण अभ्यासाशिवाय केलेलं आहे. त्याकाळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील. पण ब्राह्मण समाजातील काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. परंतु, असं न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान त्यांनी केलं”, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे.

- Advertisement -

“नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत”, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे, ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मोहन भागवत काय म्हणाले होते?

- Advertisement -

आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवं. तसेच, देशातून जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था हद्दपार व्हायला हवी, असं मोहन भागवत नागपुरात शुक्रवारी म्हणाले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -