घरमनोरंजनप्रतीक गांधी आणि सैयामी खेर यांच्या आगामी 'अग्नि' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

प्रतीक गांधी आणि सैयामी खेर यांच्या आगामी ‘अग्नि’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

Subscribe

एक्सेल एंटरटेनमेंटने आपल्या अनोख्या कंटेंटने प्रेक्षकांच्या अपेक्षा नेहमीच वाढवल्या असून नुकताच त्यांनी आपला आगामी चित्रपट ‘अग्नी’चे चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली. आपल्या सोशल मीडियावर त्यांनी ‘अग्नी’च्या सेटवरचे काही अविस्मरणीय क्षण शेअर केले असून त्यामध्ये, दिग्दर्शक राहुल ढोलकिया आणि चित्रपटाचे कलाकार प्रतीक गांधी, दिव्येंदू शर्मा, सैयामी खेर यांच्यासोबतच सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी देखील टीमसोबत धम्माल करताना दिसत आहेत.

‘अग्नी’चे चित्रीकरण पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत सैयामी खेर आणि दिव्येंदू शर्मा यांनीही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. चित्रपटातील कलाकारांसोबतच, फरहान अख्तरने देखील त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीमचे अभिनंदन केले.

- Advertisement -

एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘अग्नी’ या चित्रपटात दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि सैयामी खेर यांच्या मुख्य भूमिका असणार असून, याची कथा अग्निशमन दल आणि त्यांच्या आव्हानांवर आधारित आहे.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी त्यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत ‘ज़िंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल चाहता है’, ‘डॉन’, ‘डॉन 2’ यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांनी दर्शकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘जी ले जरा’चा निर्मितीत व्यस्त आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘गुडबाय’ चित्रपटाला प्रेक्षकांची नापसंती; पहिल्या दिवशी कमावले केवळ इतके कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -