घरमहाराष्ट्रपवार वार्‍याची दिशा अचूक ओळखणारे कसलेले खेळाडू

पवार वार्‍याची दिशा अचूक ओळखणारे कसलेले खेळाडू

Subscribe

आघाडीमध्येच फाटाफूट आहे

शरद पवार हे राजकारणातील कसलेले खेळाडू आहेत. ते वारा कोणत्या दिशेने वाहतो हे अचूक ओळखतात. त्यामुळेच त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरण्यास नकार दिला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. पाच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारांना अनुसरून काम केले. देशाचे संरक्षण आणि राष्ट्रवादाला प्राधान्य दिले, असेही ते म्हणाले.

सातारा येथे होणार्‍या लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सभा झाली. सभेत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी म्हणाले की, जे लोक सातार्‍याला बालेकिल्ला समजत होते, ते आता लढायची हिंमतही करत नाहीत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांना सातार्‍यातील पोटनिवडणुकीत उतरवायचा प्रयत्न केला. मात्र, मतदारसंघातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यांनी माघार घेतली. यावेळी चव्हाणांनी फासे उलटे फेकत शरद पवार हेच निवडणूक का लढवत नाहीत, असा सवाल विचारत त्यांना रिंगणात उतरण्याचा आग्रह केला. शरद पवार राजकारणातील कसलेला खेळाडू आहे. ते वारा कोणत्या दिशेला वाहत आहे, हे अचूक ओळखतात. त्यामुळेच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरण्यास नकार दिला, असे मोदींनी सांगितले.

या सभेत मोदींनी उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिक्षा दिली. आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीला यापेक्षा मोठा फटका बसेल, असे भाकीत नरेंद्र मोदी यांनी वर्तविले. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारांना अनुसरून काम केले. देशाचे संरक्षण आणि राष्ट्रवादाला प्राधान्य दिले. त्यासाठी सरकारने भारतीय लष्कराची क्षमता वाढवून त्यांना इतर देशांच्या बरोबरीला आणून ठेवले. भूदल, नौदल किंवा वायूदल असो, प्रत्येक ठिकाणी आधुनिक शस्त्रे ही लष्कराच्या ताफ्यात सामील झाल्याचेही मोदींनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्येच फाटाफूट आहे. ते कसे काय महाराष्ट्राला एकसंध ठेवू शकणार. आघाडीतील नेत्यांना फक्त वाटावाटी करून घेण्यात आणि मलई खाण्यातच रस आहे. शेतकर्‍यांचा विचार करण्याचे काम खर्‍या अर्थाने महायुतीने केले आहे. 1999 पर्यंत युतीचे सरकार होते. त्यानंतर सातार्‍यातील सिंचन प्रकल्पांच्या फाईल दाबून ठेवण्यात आल्या. 2014 मध्ये पुन्हा आमचे सरकार आल्यावर या फाईलवर काढण्यात आल्या आहेत. आता सातार्‍यामध्ये अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. कराड-गुहागर चारपदरी मार्गाचे काम, सातारा – कागल सहापदरी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -