घरदेश-विदेश२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद

२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद

Subscribe

आरबीआयचा खुलासा

भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०१९-२० मध्ये २००० रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाबाबत रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने हा खुलासा केला आहे.

आरबीआयने आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३,५४२.९९१ दशलक्ष नोटांची छपाई केली होती. तर, २०१७-१८ मध्ये छपाईत कपात झाली आणि १११. ५०७ दशलक्ष नोटा छापण्यात आल्या. यानंतर २०१८-१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईमध्ये अजून कपात करण्यात आली व केवळ ४६.६९० दशलक्ष नोटाच छापण्यात आल्या होत्या. तर सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वीही दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाल्याचे वृत्त आले होते, पण सरकारने ते वृत्त फेटाळले होते. इंग्रजी वृत्तपत्र बिझनेस स्टँडर्डने अधिकार्‍यांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, दोन हजार रुपयांच्या उच्च नोटांची तस्करी करणे सुलभ आहे, त्यामुळे चलनात अधिक प्रमाणात २ हजार रुपयांच्या नोटा आल्यास ते सरकारच्या उद्दीष्टांसाठी धोकादायक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -