घरमहाराष्ट्रपुणेपुण्याच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी - अतुल लोंढे

पुण्याच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी – अतुल लोंढे

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना उद्या (1 ऑगस्ट) पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya Tilak Award) सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित रहावे की, नाही हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच असतील तर, त्यांनी आपल्या शिष्याची कानउघाडणी करावी, अशी अपेक्षा आहे. असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar should open the ears of Prime Minister Narendra Modi at the Pune event Atul Londhe)

हेही वाचा – PM Modi Pune Visit : मेट्रोचे उदघाटन, दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन; पंतप्रधानांचा पुण्यात ‘असा’ आहे कार्यक्रम

- Advertisement -

देशभरात भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात इंडिया नावाने आघाडी स्थापन झालेली असताना या आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे की, नाही हा प्रश्न चर्चिला जात आहे. यावर बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ज्या व्यक्तीमुळे देशाची लोकशाही, संविधान, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला धोका पोहचलेला आहे, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थित राहू नये, अशी लोकांची इच्छा आहे. परंतु शरद पवार हे कार्यक्रमाला जातच असतील आणि ज्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आपले गुरु आहेत, त्यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे म्हटले होते. आता पुण्यात एका कार्यक्रमात गुरु-शिष्य एकत्र येतच आहेत तर, नरेंद्र मोदी जे काही करत आहेत ते लोकमान्य टिळकांच्या विचारसणीच्या विरोधात आहे, अशी कानउघाडणी गुरु शरद पवार यांनी शिष्य नरेंद्र मोदी यांची करावी, ही आमची अपेक्षा आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

हेही वाचा – पुण्यात Mr. Crime Minister पोस्टर; युवक काँग्रेसचा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध

- Advertisement -

बंडखोरीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकाच मंच्यावर उपस्थित राहणार आहे. तसेच राष्ट्रवादी बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार एका मंचावर दिसणार आहे. यामुळे उद्या होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागेल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -