Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'माझ्याकडे कृषी खात असताना पिकांना योग्य भाव देत होतो, पण आता लक्ष...

‘माझ्याकडे कृषी खात असताना पिकांना योग्य भाव देत होतो, पण आता लक्ष दिले जात नाही…शरद पवार

'माझ्याकडे कृषी खात असताना पिकांना योग्य भाव देत होतो. पण आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही'. असा हल्लाबोल करत माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं.

Related Story

- Advertisement -

‘माझ्याकडे कृषी खात असताना पिकांना योग्य भाव देत होतो. पण आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही’. असा हल्लाबोल करत माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं.जुन्नर य़ेथे सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव आणि दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी पिक रस्त्यावर फेकून देत आहेत. नाशिक येथेही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. याचपार्श्वभूमीवर पवार यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. माझ्याकडे १० वर्ष कृषी खात होतं. त्यावेळी मी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव द्यायचो. शेतकरी देशाची भूक भागवतो. जगाला अन्नधान्य पुरवण्याच काम करू शकतो. पण केंद्र सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. यामुळे शेतमालाच्या किंमती घसरत असल्याचही पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisement -