घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar : मराठा आरक्षणाचं भवितव्य सुप्रीम कोर्ट ठरवेल; शरद पवारांची पहिली...

Sharad Pawar : मराठा आरक्षणाचं भवितव्य सुप्रीम कोर्ट ठरवेल; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून, तेथे त्यांनी शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना मराठा आरक्षणाच्या विधेयकावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हायकोर्टातून आरक्षण बाद झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हायकोर्टातून पास होऊन सर्वोच्च न्यायालयात गेलं. तेथे ते नाकारलं

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचं विधेयक दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत मराठा आरक्षणावर शंका उपस्थित केली आहे. (Sharad Pawar Supreme Court will decide the fate of Maratha reservation Sharad Pawars first reaction)

शरद पवार आज (20 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर असून, तेथे त्यांनी शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना मराठा आरक्षणाच्या विधेयकावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हायकोर्टातून आरक्षण बाद झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हायकोर्टातून पास होऊन सर्वोच्च न्यायालयात गेलं. तेथे ते नाकारलं. यावेळी तोच ड्राफ्ट आहे. तसाचा तसा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. तो एकमताने संमतही झाला. आता सर्वोच्च न्यायालयात काय होईल त्यावर त्याचं भवितव्य टिकून आहे. त्याबाबत आता काही सांगता येत नाही. असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांना आगामी लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी देणार का? याबाबत विचारले असता ते शरद पवार म्हणाले की, असा निर्णय घेणारा मी एकटा नाही. महाविकास आघाडीतील इतर पक्षनेत्यांशी बोलावे लागणार आहे. परंतु जर कोल्हापूरकरवासीयांची इच्छा असेल आणि शाहू महाराज छत्रपती राजकारणात येत असतील तर मला आनंदच आहे असे म्हणत शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत एकार्थी होकारच दिला.

हेही वाचा : Maratha Reservation: मराठा आरक्षण कोर्टात टिकणार! महाराष्ट्र सरकारने घेतली ‘अशी’ काळजी

- Advertisement -

उर्वरित जागांसाठी निर्णय घेऊ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील जागावाटप झाले का? याबाबत विचारले असता म्हणाले की, 48 पैकी 39 जागांवर एकमत झाले आहे. उरलेल्या जागावर आम्ही वरिष्ठ बसून निर्णय घेऊ अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगेंचे आंदोलन आता निकाली निघाले का? राज्यभर एकच प्रश्न

त्यांनी आकडे सांगताना सुधारणा करावी

महायुतीकडून आगामी लोकसभेबाबत 400 पारचा नारा दिला जात आहे. याचे तुम्हाला (महाविकास आघाडीला) आव्हान वाटते का? याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, लोकसभेच्या पाचेशहून अधिक जागा आहेत. महाराष्ट्रात 48 आहेत. कसं आहे की, ते सांगताना (महायुती) कमी सांगत आहेत. त्यांनी चाळीस नव्हे सर्व 48 पैकी 48 आणि देशातील सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत असे सांगावे. त्यामुळे यापुढे आकडा सांगताना सुधारणा करावी असा माझा सल्ला आहे. असाही टोला शरद पवारांनी भाजपसह महायुतीला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -