घरताज्या घडामोडीSharad Pawar : 'माझ्या वाटेला गेलात तर...', शरद पवारांचा अजितदादांच्या आमदाराला इशारा

Sharad Pawar : ‘माझ्या वाटेला गेलात तर…’, शरद पवारांचा अजितदादांच्या आमदाराला इशारा

Subscribe

मला शरद पवार म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला. लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

मला शरद पवार म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला. लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. (sharad pawar warn ncp ajit pawar mla sunil shelke in style)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे लोणावण्यात आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी शरद पवार यांनी मेळाव्यातील उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना कार्यकर्त्यांना धमकाल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना नाव न घेता इशार दिला.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

लोळावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र या मेळाव्यात कार्यकर्ते उपस्थित राहू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी धमकावत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

सुनील शेळकेंना शरद पवारांचा इशारा

“मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला इथण कोण आलं होतं. त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होतं? फॉर्म भरताना पक्षाचं चिन्ह आणि नेत्याची सही लागते, ती सही माझी सही आहे. माझ्या सहीवर तुम्ही निवडून आलात. आणि त्याच पक्षाच्या, त्या विचाराच्या लोकांनी राबलं, घाम गाळला त्यांना तुम्ही दमदाटी देतात. हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे एकदा दमदाटी दिली ठीक आहे. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने कधी जात नाही, पण या वाटेने मला जाण्याची सुरूवात कोणी केली तरी ती तुम्ही केली. पण माझ्या वाटेला कोणी गेलं तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता सुनील शेळकेंना इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – LOKSABHA : जागावाटपावर अजित पवारांचं मोठ वक्तव्य; म्हणाले, एकनाथ शिंदे आणि मी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -