घरमहाराष्ट्रनागपूरShinde Vs Thackeray : कोविड काळातील भ्रष्टाचारावरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shinde Vs Thackeray : कोविड काळातील भ्रष्टाचारावरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

महापालिकेत बेकायदा बांधकामावर बोलायचं झालं असेल तर यापुढे अनधिकृत बांधकाम कोणालाही करता येणार नाही. भ्रष्टाचारावर बोललात पण कोविडवर कुणी बोललं नाही. मुंबईत जे काही झालं त्यावर हसावं की रडावं हे कळत नाही. कोविड काळात केलेला भ्रष्टाचार हा मैताच्या टोळीवरचे लोणी खाण्यासारखं आहे. कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या कथा म्हणजे अरिबीयन नाइट्सच्या कथेलाही लाजवतील असे म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. मात्र कॅग आणि ईडी या विविध य़ंत्रणेच्या माध्यमातून वाचा फुटली होती.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गौप्यस्फोट करत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तर यापुढे टीका करताना विचार करा, माझ्याकडील पोतडीत खूप काही आहे असे म्हणत ठाकरेंना इशारा दिला. (Shinde Vs Thackeray Chief Minister attacks Thackeray on corruption in Kovid era)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शालेय शिक्षण व्यवस्थेच्या झालेल्या दुरवस्थेचा येथे उल्लेख केला. ती अवस्था तुमच्याच सरकारच्या काळात झाली होती. केंद्र सरकारच्या अहवालात 2017 ते 2019 मध्ये महाराष्ट्र अव्वल होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची घसरण झाली. राज्य थर्डक्लासवर गेलं. डिजिटल स्कूल, वर्ल्डक्लास शिक्षणाच्या गमजा आणि गप्पा मारणाऱ्यांनी शिक्षण थर्डक्लासवर नेलं होतं. परंतु आम्ही विविध योजना राबवत आहेत. संच मान्यता, शिक्षक भरती, शाळा मान्यता या प्रक्रिया शिक्षणमंत्री केसरकर राबवत आहेत. सीएसआरच्या माध्यमातून अनेक कंपन्या पुढे येत आहेत. म्हणून शिक्षण व्यवस्था आता सुधारेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तर कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी विकासाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिलं. तर अनधिकृत बांधकामं कुणी करत असेल तर त्यावर कारवाई करा, जे अधिकारी सहाकार्य करत असतील त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

हेही वाचा : Devendra Fadnavis : NCRB चा Report कसा वाचतात तेच आज शिकवतो; फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात

महापालिकेत बेकायदा बांधकामावर बोलायचं झालं असेल तर यापुढे अनधिकृत बांधकाम कोणालाही करता येणार नाही. भ्रष्टाचारावर बोललात पण कोविडवर कुणी बोललं नाही. मुंबईत जे काही झालं त्यावर हसावं की रडावं हे कळत नाही. कोविड काळात केलेला भ्रष्टाचार हा मैताच्या टोळीवरचे लोणी खाण्यासारखं आहे. कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या कथा म्हणजे अरिबीयन नाइट्सच्या कथेलाही लाजवतील असे म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. मात्र कॅग आणि ईडी या विविध य़ंत्रणेच्या माध्यमातून वाचा फुटली होती.

- Advertisement -

हेही वाचा : Winter Sessio : Nagpur Factory Blast मधील मृतांच्या नातेवाईकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा

कोविड काळातील भ्रष्टाचारावरुन ठाकरे गटावर हल्लाबोल

कोविड काळात राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत जगत होती. अशा परिस्थितीमध्ये भीतीच्या वातावरणात पैसे लुटण्याचा हा किळसवाणा प्रकार करण्यात आला. कफन चोर, खिचडी चोर ही बिरुदं देखील कमी पडतील असाच प्रकार होता. ऑक्सिजन प्लॅंट उभारणीतसुद्धा भ्रष्टाचार केला आहे. काही लोकांच्या कृपेने टेंडरचा पाऊस पडला. उत्तर प्रदेशातील हायवे कंस्ट्रक्शन नावाची एक कंपनी येथे अशी काही तळपळली आणि त्यांनी अवास्तव कामं घेतली. आदित्य राजाच्या कृपेने वरुणराजाने टेंडरचा पाऊस पडला. यामध्ये मुख्य प्यादा म्हणजे तो रोमील छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथेची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्वीन प्रकरणापासून, हायवे ब्रीज बनविणाऱ्या या कंपनीला चक्क पेग्वींगसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचं काम देण्यात आलं. कंत्राट मुंबई महापालिकेनं बहाल केलं. या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे हे काम रोमीन छेडाला दिले. यानंतर रोमीलचा रोमहर्षक प्रवास सुरु झाला. पुढील चार वर्षात 270 कोटी रुपयांची 57 कंत्राट देण्यात आली. याच कंपनीला ऑक्सिजन प्लॅंट उभारणीचं काम दिलं. पण तो रोमील छेडा हा बोरीवलीत परिहार डिपार्टमेंटल नावाचं कपड्याचं दुकान चालवत होता. ही वस्तुस्थिती आहे. हे तपासात पुढे आलेलं आहे. दोन टक्के पैसे ठेऊन सगळे पैसे या रोमील छेडाच्या खात्यात वळविण्यात आले. एकीककडे माणसं मरतायेत आणि इकडे असा भ्रष्टाचार केल्या केल्या गेला. ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांनी याचा विचार करायला हवा होता. ऑक्सिजन प्लॅंट उभारणीचं काम जुलैमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असताना ते ऑक्टोबरमध्ये पूर्ण झालं आणि ते दाखवलं ऑगस्टमध्ये. त्याला दंड आकारला तो 3 कोटी रुपये. तो 9 कोटी रुपये आकारायला हवा होता. मात्र पुन्हा त्याच कंत्राटदाराला 80 कोटीचं आणखी कंत्राट देण्यात आलं. ऑक्सिजन प्लॅंटचा रोबोटिक झ्यूपासून सगळं कंत्राटं देण्यात आली. एवढंच नाही तर मुंबई महापालिकेतील वॉटर क्यूरिफायर देण्याचं कामंही देण्यात आलं. जुहू हॉस्पीटलचं कामही देण्यात आलं. जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे हॉस्पीटलचेही काम याच कंपनीला देण्यात आले. एवढ्या डिटेल्समध्ये मी कधीच बोललो नव्हतो. परंतु तुम्ही रोज आमच्यावर टीका करणार तर मग त्याला उत्तर मिळणारच म्हणून यापुढे टीका करताना विचार करावा नाही तर माझ्या पोतडीत खूप काही आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना इशारा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -