घरमहाराष्ट्रWinter Session : मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका, म्हणाले - "हे लोक...

Winter Session : मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका, म्हणाले – “हे लोक दिशाहीन…”

Subscribe

विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या कामकाजावर सडकून टीका केली आहे.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. गेल्या 10 दिवसांपासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर कालपासून (ता. 19 डिसेंबर) अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांकडून मांडण्यात येत आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या कामकाजावर सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला अंतिम आठवडा वाचल्यानंतर आणि ती भाषणे ऐकल्यानंतर जाणवले की, विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. (Winter Session: CM Eknath Shinde severely criticized while replying to proposal in the final week)

 हेही वाचा… Winter Session : विदर्भाच्या प्रस्तावावरून उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला अंतिम आठवडा वाचल्यानंतर आणि ती भाषणे ऐकल्यानंतर जाणवले की, विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आपले म्हणजेच अवसान गळाले आहे, असे वाटते. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हे जागा वाटपात व्यस्त असल्याने त्यांना मार्गदर्शन मिळाले नसेल. तर दिशा प्रकरणामुळे हे लोक दिशाहीन झालेले दिसले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.

तसेच, अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे, याचा विचारही विरोधकांनी केला पाहिजे. कालपर्यंत जलयुक्त शिवार संदर्भात भ्रष्टाचारयुक्त आणि प्रभावहीन असल्याची ओरड विरोधी पक्ष करत होता. पण ही योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ती सुरू झाली आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यानंतर ही योजना बंद झाली. पण आता ती योजना अनेक भागात राबविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आपली ओरड आणि आरोप किती खोटे होते, हे पाहायला मिळत आहे, असेही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले. अडीच वर्ष ही योजना बंद करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्याचे आणि त्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले, असा आरोपही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

- Advertisement -

राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास साधण्याचे काम या सरकारने करायचे असते. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, महिला अन्य कोणीही यांचा विकास साधण्याचे काम सरकारने करायचे असते. परंतु, सूड भावनाने आधीच्या सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरण्याचे काम केले. अनेक प्रकल्प रखडवले गेले. हे चांगल्या राज्यकर्त्याचे काम नाही की त्यांनी आपल्या अहंकारापोटी राज्याला विकासापासून वंचित ठेवणे, मागे ढकलणे हे योग्य नाही. एफडीआयपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्वच गोष्टीत आघाडीत असलेले राज्य मविआच्या काळात मागे पडले. पण आम्ही कारभार हाती घेतल्यानंतर एफडीआयमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर राज्य आणण्याचे काम महायुतीने केले. आमचे सरकार आल्यानंतर अनेक महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प हे फास्ट ट्रॅकवर आल्याची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -