घरमहाराष्ट्रनागपूरWinter Sessio : Nagpur Factory Blast मधील मृतांच्या नातेवाईकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा

Winter Sessio : Nagpur Factory Blast मधील मृतांच्या नातेवाईकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा

Subscribe

नागपूर : संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणाऱ्या नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 17 डिसेंबर रोजी सकाळी घडली होती. या घटनेचे पडसाद नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी नागपूर फॅक्टरी ब्लास्टमधील मृतांच्या नातेवाईकांसाठी आज (20 डिसेंबर) विधान परिषदते मोठी घोषणा केली आहे. (Winter Session A big announcement from the government for the relatives of those killed in the Nagpur Factory Blast)

 हेही वाचा – Danve vs Sattar : कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज…; अंबादास दानवेंचे सत्तारांवर गंभीर आरोप

- Advertisement -

कामगार मंत्री डॉ. सुरेष खाडे यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले की, नागपूर ब्लास्टमधील मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. 8 मृतकांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळणार आहे. एका कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार असून मृत व्यक्ती ईएसआयमध्ये नसल्याने त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळणार नाही. कंपनीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फंडातून आधीच 5 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान सहाय्यता निधीतून आणखी मदत मिळवून देण्याचा आमदार प्रयत्न आहे. तसेच मृत कुटुंबातील मुलाच्या शाळेची जबाबदारी सरकार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

नागपूर-अमरावती रोडवरील सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता स्फोट झाला होता. स्फोटाच्या वेळी कंपनीत एकूण 12 कर्मचारी हजर होते. नागपूर-अमरावती रोडवरील बाजारगाव येथे घडलेल्या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता, यात 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश होता. या स्फोटात 3 जण जखमी होती. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : दानवेंच्या आरोपानंतर भाजपाच्या मंत्र्याने खिशातून काढला राजीनामा अन् गोऱ्हेंनी लगावला टोला

मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची तातडीची मदत

दरम्यान, नागपूर घटनेनंतर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट करत मृतकांप्रती सहवेदना व्यक्त करत मृतांच्या कुटुबीयांना 50 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले  होते की, संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी नागपूर येथील कंपनी सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. दुर्घटनेतील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -