घरमहाराष्ट्रपुणेEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती ही राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तारखेप्रमाणे ही जयंती साजरी करण्यात येत असून ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने आज (ता. 19 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर शिवराय म्हणजे धैर्य आणि दूरदृष्टी असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले. (Shiv Jayanti 2024 Shiv Janmatsav celebrated with enthusiasm at Shivneri by Chief Minister Shinde)

हेही वाचा… Shiv Jayanti 2024 : विश्वस्त म्हणून आम्ही काम करू – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

शिवजन्मोत्सव सोहळ्यानंतर किल्ले शिवनेरी येथे भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण जगभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे सर्वव्यापी हिंदुत्व. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे त्यांची पद्धत होती. त्याचमुळे शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासन, प्रशासक, आदर्श राजा रयतेचा राजा होते, अशी महाराजांची अनेक रूपं आपण त्या काळात पाहिली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवरायांचा गुणगौरव केला.

तसेच, छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते, तेवढेच व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, असेही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी भाषणातून सांगण्यात आले.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळची आठवण सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखं भारतामध्ये आणली जाणार आहेत. तर कालच सांस्कृतिक मुनगंटीवार यांनी दांडपट्ट्याची राज्यशस्त्र म्हणून घोषणा केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -