घरमहाराष्ट्र"दूसरों को खामखा बदनाम करनेवाले...'', शायरीतून संजय राऊतांचा विरोधकांना टोला

“दूसरों को खामखा बदनाम करनेवाले…”, शायरीतून संजय राऊतांचा विरोधकांना टोला

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांवर विरोधीपक्ष भाजपाकडून घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. भाजपांच्या या आरोपांवर सरकारही प्रत्युत्तर देत आहे. याचदरम्यान, शिवसेना आणि भाजपा यांच्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांवर विरोधीपक्ष भाजपाकडून घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. भाजपांच्या या आरोपांवर सरकारही प्रत्युत्तर देत आहे. याचदरम्यान, शिवसेना आणि भाजपा यांच्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत प्रत्युत्तर देत आहेत. अशातच आता संजय राऊत यांनी ट्वीटर एक शायरी पोस्ट केली आहे. या शायरीमध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

“दूसरों को खामखा बदनाम करनेवाले,
अपने गिरेबान मे झांककर देख,
तुझसे ‘मैला’ कोई नही इस दुनिया में!”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवर शायरी पोस्ट करत नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी स्वत:ची प्रतिमा तापासून पाहावे, तुमच्यापेक्षा भ्रष्ट्राचारी या जगात कुणीच नाही, असा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये ट्विटरवॉर सुरु झाले आहे.

- Advertisement -

भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात संजय राऊत ईडीला आपले काम करु द्या, त्यात मी दखल देणार नाही, असं म्हणत आहेत. तर शिवसेना कार्यकर्ते संजय राऊत यांचं समर्थन करताना दिसत आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत काल मुंबईत दाखल झाले. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांचं ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतावेळी शिवसैनिकांसह शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू आणि खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. तसंच, हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर उपस्थित होते.

- Advertisement -

योद्धा नावांच्या फलकांसह राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. संजय राऊत मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमय्यांचा भ्रष्टाचार पुराव्यासह बाहेर काढला. सोमय्यांकडे आता उत्तर असूच शकत नाही, म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला हे स्पष्ट असल्याचं राऊत म्हणाले. सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्यावर आता देशात चर्चा सुरू झाली आहे. विक्रांतसाठी मिळवलेल्या पैशातून सोमय्यांनी मनी लाँड्रिंग केलं, अस संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – संजय राऊतांनंतर पुढचा नंबर ‘या’ मंत्र्याचा, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -