घरताज्या घडामोडीसेना नगरसेविका राधा बेंडकोळी यांचे निधन; सासूचाही मृत्यू

सेना नगरसेविका राधा बेंडकोळी यांचे निधन; सासूचाही मृत्यू

Subscribe

शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधा बेंडकोळी यांचे ७ एप्रिल रोजी सायंकाळी निधन झाले. दुर्दैव म्हणजे, याच दिवशी सकाळी त्यांच्या सासू तथा पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णूपंत बेंडकोळी यांच्या मातोश्री पुंजाबाई बेंडकोळी यांचे निधन झाले. एकाच दिवशी सासू व सुनेचे निधन झाल्याने बेंडकोळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

राधा बेंडकोळी यांनी आनंदवली परिसरातील प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेच्या वतीने प्रतिनिधीत्व केले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेच्या चारही नगरसेवकांच्या पॅनलला मतदारांनी पसंती दिली होती. त्यात राधा बेंडकोळी यांचा समावेश होता. प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी त्या सतत आग्रही असत. प्रभागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रमही राबवले. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरूवारी (दि.७) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विष्णूपंत बेंडकोळी यांच्या त्या पत्नी होत. गुरूवारी सकाळीच त्यांच्या सासूबाई पुंजाबाई बेंडकोळी यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आटोपल्यानंतर काही तासांतत राधा बेंडकोळी यांचे निधन झाल्याने बेंडकोळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. राधा बेंडकोळी यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -