घरमहाराष्ट्रकोरोना संकटात महाराष्ट्रविरोधी कारवाया करणारे झारीतील शुक्राचार्य शोधायला हवेत- संजय राऊत

कोरोना संकटात महाराष्ट्रविरोधी कारवाया करणारे झारीतील शुक्राचार्य शोधायला हवेत- संजय राऊत

Subscribe

कोरोना संकटात महाराष्ट्रविरोधी कारवाया करणारे झारीतील शुक्राचार्य शोधायला हवेत, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय रात यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र हे सर्वात जास्त टेस्टिंग करुन सर्वाधिक रुग्ण असलेलं राज्य आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवा अशी आमची मागणी आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात आरोग्य सुविधा कमी पडू देणार नसल्याचं म्हटलं. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जात आहेत? हा वारंवार प्रश्न निर्माण होत आहे. पंतप्रधानांच्या मनात काही नसेल किंवा केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेल. तर मग कोणी झारीतले शुक्राचार्य आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी आरोग्य सुविधा कमी पडू देणार नसल्याचं म्हटलं. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जात आहेत? प्रधानांच्या मनात काही नसेल किंवा केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेल. तर मग कोणी झारेचे शुक्राचार्य आहेत का? की ते फक्त महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा शुक्राचार्यांना ओशधायला हवं. केंद्राकडून महाराष्ट्राला दुजाभाव का? किमान अशा संकटाच्या काळात तरी राजकारण करुन नये, असं राऊत म्हणाले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राशी संवाद साधून हा प्रश्न सोडवतील, असं राऊत यांनी म्हटलं. न्यायालयाच्या आदेशावर केंद्र सरकारने विचार करायला हवा. प्रत्येक ठिकाणी त्या त्या राज्याच्या उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचं राऊत म्हणाले.

- Advertisement -

रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या वाटपावरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले ही खरी बाब आहे. पण मग न्यायालयाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सांगाव्यात. न्यायमूर्ती वेगाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करु शकतात का?, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे सध्या न्यायालयांनी सरकारच्या कारभारावर शेरे किंवा ताशेरे ओढू नयेत, असे संजय राऊत यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला.

गेल्या २४ तासांत देशात तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. अनेक राज्यांमध्ये अजूनही कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या नक्कीच यापेक्षा जास्त आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार सर्व जबाबदारी आता राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -