घरमहाराष्ट्रनटीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी पीडितेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावं - संजय राऊत

नटीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी पीडितेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावं – संजय राऊत

Subscribe

मंबईत एका नटीचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं म्हणून तिच्या बाजूने उभे राहिले, त्यांनी आता हाथरसला जाऊन पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. संजय राऊत यांनी हाथरस सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध करत पीडित मुलीला न्याय मिळायला हवा, अशी मागणी केली. याशिवाय, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीवर देखील प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हाथरस प्रकरणावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामासाठी काहींनी आकांडतांडव केला. या लोकांनी आता हाथरसला जाऊन शोषित समाजातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढावी, असं संजय राऊत म्हणाले. दलित, शोषित समाजातील मुलीचा आक्रोश जगापर्यंत पोहोचू नये यासाठी दडपशाही केली जाते. पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपवर प्रहार केला. यावेळी त्यांनी राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचं मी पाहिलं. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. महाराष्ट्रात अनेक आंदोलनं झाली, पण असा प्रकार कधी घडला नाही आणि घडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिवाय, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी कोणी करत असेल तर त्या राज्याचा प्रश्न आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -