घरताज्या घडामोडीBabasaheb Purandare : लोकांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या कामातही उणिवा काढल्या, पण... पवार म्हणाले...

Babasaheb Purandare : लोकांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या कामातही उणिवा काढल्या, पण… पवार म्हणाले…

Subscribe

नव्या पिढिला आपल्या पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत मांडण्याचे, इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी ज्यांनी शेकडो व्याख्याने घेतली ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या मनात ज्यांनी आस्था निर्माण केली, असे इतिहासासाठी योगदान देणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिले. एका गोष्टीचे समाधान म्हणता येणार नाही, पण ते दीर्घायुषी होते. त्यांची वयाची शंभरी यशस्वी झाली होती. पण या सगळ्या काळात सतत लोकांशी सुसंवाद ठेवून त्यांना लोकांच्या सदिच्छा मिळाल्या, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर व्यक्त केली.

इतिहासात काही वादग्रस्त मुद्देही होते… पण 

आज बाबासाहेब पुरंदरे नाहीत याचे एक वैयक्तिक अस्वस्थतता, दुःख आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास हा राज्याच्या समोर ठेवला. या इतिहासात काही वादग्रस्तसुद्धा मुद्दे होते, पण त्यासंबंधीचे भाष्य मी जाणकार किंवा इतिहासाच्या संबंधिचा तज्ज्ञ नाही, असेही पवार म्हणाले. कुणीही काहीही मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा लोक काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याच योगदान विसरता येणार नाही, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले काम पुढे नेण्यात यावे, टिकवून ठेवावे यासाठी काही करता येईल का ? प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. या कार्यासाठीची विभिन्न मत आहे. अगदी तीव्र मतही आहेत, त्यामुळे मला त्याच्यात पडायच नाही, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.


हेही वाचा Babasaheb Purandare : कसे घडले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जाणून घ्या

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -