घरमहाराष्ट्रBabasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Babasaheb Purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात न्युमोनिया या आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनामुळे राज्यसह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या निधनावर व्यक्त केला शोक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे दु:ख शब्दात व्यक्त कठीण आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच येणारी भावी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. शिवशाहीर पुरंदरे यांची इतर कार्यही काय स्मरणात राहतील. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने एका युगाचा अंत – अमित शाह

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही एक व्हिडिओ शेअर करत बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतवर्षाच्या आसमंतातील तेजस्वी शिवतारा निखळला- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

दरम्यानर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तित्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले. अलीकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असताना व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे.  या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो,  असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखा अलौकिक शिवआराधक होणे नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवछत्रपतींचा कालखंड डोळ्यांसमोर उभा करणारे शिवशाहीर हरपले- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शतकाच्या उंबरठ्यावरील निधन दुःखद आहे.
आपल्या आवेशपूर्ण ओघवत्या वक्तृत्वाने शिवछत्रपतींचा कालखंड सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर उभा करणारे शिवशाहीर आज हरपले.

महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला- राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली आहे.


बाबासाहेब पुरंदरेंच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत- देवेंद्र फडणवीस

प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब यांना श्रद्धांजली अर्पण केली.

घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब…- खासदार उदयराजे भोसले

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत. अशा शब्दात खासदार उदयराजे भोसले यांनी दु:ख व्यक्त केले.


Babasaheb Purandare : कसे घडले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जाणून घ्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -