घरमहाराष्ट्रअहमदनगरमध्ये चोरांच्या गोळीबारात पोलीस जखमी

अहमदनगरमध्ये चोरांच्या गोळीबारात पोलीस जखमी

Subscribe

चोरांनी केलेल्या गोळीबारात राहाता पोलीस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान एका चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांपैकी एक पोलीस चोरांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे ही घटना घडली आहे. चोरांनी केलेल्या गोळीबारात राहाता पोलीस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान एका चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिर्डीमधील रुग्णालयात पोलिसावर उपचार

सोनसाखळी चोरांची एक टोळी राहाता शहरात आल्याची माहिती राहाता पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्या टोळीला पकडण्यासाठी राहाता पोलीस रवाना झाले होते. यावेळी पोलीस आणि चोरांमध्ये झटापट झाली. त्यावेळी एकाने गावठी पिस्तूलमध्ये पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारात पोलीस कर्मचारी पठारे हे जखमी झाले. तर टोळीतील सचिन काटे याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याचे साथीदार पळून गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान जखमी पोलीस कर्मचारी पठारे यांच्यावर शिर्डीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -