घरमहाराष्ट्र'मोदींनी राजकारण सोडले तर मी सुध्दा राजकारण सोडेल' - स्मृती इराणी

‘मोदींनी राजकारण सोडले तर मी सुध्दा राजकारण सोडेल’ – स्मृती इराणी

Subscribe

'ज्या दिवशी प्रधानसेवक नरेंद्र मोदी राजकारणातून संन्यास घेतील, त्याच दिवशी मी सुध्दा भारतीय राजकारणाला अलविदा करेल' केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला आदर्श मानणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून संन्यास घेतला तर मी देखील राजकारणातून संन्यास घेईल.’ पुण्यात आयोजित केलेल्या वर्डस काउंट या शब्दोत्सवाचा समारोप स्मृती इराणी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमातील परिसंवादा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेठीमध्ये २०१४ च्या निवडणुक प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांना लहान बहिण असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

तर मी सुध्दा राजकारण सोडेल

स्मृती इराणी यांनी पंतप्रधानांप्रती आपला सन्मान जाहीर करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मोदी स्वत:ला प्रधानसेवक म्हणतात. याचसंदर्भात एका प्रेक्षकाने स्मृती इराणींना प्रश्न विचारला की, तुम्ही सुध्दा प्रधानसेवक बनण्याच्या रेसमध्ये आहे. याच प्रश्नाचे उत्तर देताना स्मृती इराणी यांनी सांगितले की, ‘ज्या दिवशी प्रधानसेवक नरेंद्र मोदी राजकारणातून संन्यास घेतील, त्याच दिवशी मी सुध्दा भारतीय राजकारणाला अलविदा करेल.’ दरम्यान, स्मृती इराणी यांनी भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांची देखील आठवण काढली. त्यांनी असे सांगितले की, ‘मी राजकारणामध्ये चांगल्या नेत्यांसोबत काम करण्यासाठी आली आहे. यामध्ये मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. कारण मी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या नेतृत्वाखाली काम केले आहे आणि आता मोदींसोबत काम करत आहे.

हत्ती बसल्यावर सायकल पंक्चर झाली

दरम्यान, स्मृती इराणी यांनी गांधी घराण्यावर टीका केली आहे. ‘अमेठी मतदार संघात गांधी घराण्याच्या चार पिढ्या कार्यरत असूनही तेथील शेतकऱ्यांचे भले ते करु शकले नाहीत, मग देशातील शेतकऱ्यांचे काय भले करणार’, असा सवाल करत त्यांनी गांधी घराण्यावर टीका आहे. यावेळी विरोधकांच्या महाआघाडीबाबत बोलताना ‘सायकलवर हत्ती बसला होता, तेव्हा सायकल पंक्चर झाली होती’, असे वादग्रस्त वक्तव्य स्मृती इराणी यांनी केले आहे. ‘लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. सरकारने कायम विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि पक्ष म्हणून विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली जातात’, असं देखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -