या चित्रपटासाठी सनी देओल बनणार खलनायक

आपल्या दमदार अभिनय आणि गाजलेल्या संवादांसाठी लोकप्रीय असलेला अभिनेता सनी देओल आता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

sunny-deol
सनी देओल

आपल्या दमदार अभिनय आणि गाजलेल्या संवादांसाठी लोकप्रीय असलेला अभिनेता सनी देओल आता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. वयाची साठी ओलांडणाऱ्या या कलाकाराची क्रेझ आजही त्याच्या चाहत्यांमध्ये कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवत नसले तरी त्याची फॅन फॉलोइंग मात्र कमी झालेली नाही. इतकेच नव्हे तर त्याच्याकडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही ये-जा वाढली आहे. अनेकांकडे सनीसाठी दमदार भूमिका आहेत. मात्र सनी एका मागोमाग एक स्क्रिप्ट रिजेक्ट करत आहे. परंतू त्यातली एक स्क्रिप्ट त्याला भयंकर आवडली असल्याचे समजते. ती म्हणजे खलनायकाच्या भूमिकेतील स्क्रिप्ट आहे.

आंखे चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसणार 

सनीने नुकतीच अनीस बज्मी यांची भेट घेतली होती. सध्या ते सुपरहिट चित्रपट ‘आंखे’च्या सीक्वलवर काम करत आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झाली असून अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटासाठी होकार दिला आहे. या सीक्वलमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी अनीस यांना गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरु होता. त्यांचा हा शोध सनीजवळ येऊन संपल्याचे समजते. ‘आंखे २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी सनी एकदम परफेक्ट असल्याचे त्यांचे मत आहे.