घरताज्या घडामोडीमाहिम येथील अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

माहिम येथील अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

Subscribe

माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मुंबई : माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

‘सन २००७ पासून माहिम येथील कापडबाजार,ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी जागेची खूप कालावधीपासूनची मागणी लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी’, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. (Space will be provided for Anganwadi in Mahim Says Minister Mangalprabhat Lodha In Mumbai vvp96)

- Advertisement -

या कार्यक्रमावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जी उत्तर वॉर्ड येथे २१९२ तक्रारीपैकी आज दाखल झाल्या असून जागीच १६० तक्रारींचे निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. दरम्यान, यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी उत्तर वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.

- Advertisement -

महापालिकेच्या भायखळा ई वॉर्ड येथे गुरूवारी (२८ एप्रिल) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. दुपारी ३ ते ५.३० या वेळेत हा उपक्रम सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठीhttps://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निरोप देताना पत्नी लता शिंदेंच्या डोळ्यात पाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -