घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निरोप देताना पत्नी लता शिंदेंच्या डोळ्यात पाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निरोप देताना पत्नी लता शिंदेंच्या डोळ्यात पाणी

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला म्हणजेच आपल्या मुळगावी गेले होते. साताऱ्यातील दरे येथे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे वास्तव्यास होते. आज ही तीन दिवसांची सुट्टी संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिदे मुंबईच्या दिशेने निघाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना निरोप देताना त्यांच्या पत्नी लता शिंदे या कमालीच्या भावुक झालेचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला म्हणजेच आपल्या मुळगावी गेले होते. साताऱ्यातील दरे येथे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे वास्तव्यास होते. आज ही तीन दिवसांची सुट्टी संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिदे मुंबईच्या दिशेने निघाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना निरोप देताना त्यांच्या पत्नी लता शिंदे या कमालीच्या भावुक झालेचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले तेव्हा लता शिंदे यांचे डोळे पाण्याने भरले होते. (cm eknath shinde left from satara to mumbai after shinde wife lata shinde emotional)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी दोन दिवस मुक्कामास होते. यावेळी त्यांनी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली. तापोळा-महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. त्याचबरोबर महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही त्यांनी आढावा बैठक घेतली. शिवाय, गावातील काही कार्यक्रमांना देखील त्यांनी हजेरी लावली होती.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने निर्णय येणं अद्याप बाकी आहे. आठवडाभरात न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. मात्र, या निकालापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच आगामी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असतील अशाही चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला तीन दिवस तातडीच्या सुट्टीवर गेले. एकनाथ शिंदे यांनी तातडीची सुट्टी का घेतली अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांवर संकट आल्याने गावात पूजा आयोजित करण्यात आली होती. त्याचमुळे ते तातडीने साताऱ्याला गेले, असा आरोप विरोधकांनी केला.

- Advertisement -

असा सगळा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबईच्या दिशेने निघाले. त्यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या पत्नीसह त्यांचे सर्व कुटुंबीय हेलिपॅडवर आले होते. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांचीही मोठी फौज उपस्थित होती. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाची रजा घेतेवेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांना भरून आले होते.


हेही वाचा – पुन्हा राजकीय उलथापालथ? ठाकरे गटातील १३ आमदार संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -