घरमहाराष्ट्रगणेशोत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या

गणेशोत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या

Subscribe

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता विशेष गाड्यांची सोय रेल्वे प्रशासनाने केली आहे. या गाड्यांसाठी शनिवार, ३० जूनपासून प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे. यंदा गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे.

३० जूनपासून आरक्षण सुरू 

मुंबईत राहणारे बहुतांश नागरिक गणेशोत्सवाच्या सणाला कोकणात जातात. त्याशिवाय दरवर्षी राज्यभरातून या सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहयला मिळते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीकरता रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्यण घेतला आहे. यंदा कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने १३२ विशेष गाड्यांची सोय मुंबईतील चाकरमान्यांसाठी केली आहे. विशेष गाड्या मुंबई, एलटीटी, दादर, पुणे स्थानकातून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेरनम या स्थानकांसाठी चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी प्रवाशांना शनिवार, ३० जूनपासून तिकीट आरक्षित करता येणार आहेत. मुंबई ते सावंतवाडी विशेष गाड्यांच्या ४४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या ५ ते ३० सप्टेंबर दरम्यान आठवड्यातील सहा दिवस (गुरुवार वगळता) धावणार आहे.

सावंतवाडी गाड्यांच्या ८ फेऱ्या 

मुंबईहून सुटणारी ०१००१ मुंबई ते सावंतवाडी ही विशेष गाडी दररोज रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटून सावंतवाडीला दुपारी २ वाजून १०मिनिटांनी पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ०१००२ सावंतवाडी ते मुंबई गाडी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सुटून मुंबईला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल. मुंबई ते सांवतवाडी विशेष गाड्यांच्या ८ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तर ०१००७ मुंबई ते सांवतवाडी विशेष गाडी ६ ते २७ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ०१००८ सावंतवाडी ते मुंबई गाडी गुरुवारी दुपारी ३ वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहचणार आहे. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झराप या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

- Advertisement -

सीएसएमटीहून गाड्या सुटणार 

मुंबई – रत्नागिरी – पनवेल विशेष गाड्यांच्या २२ फेऱ्या चालवण्यात येणार असून ५ ते १५ सप्टेंबर दरम्यान दररोज या फेऱ्या धावणार आहेत. दरम्यान, ०१०३३ सीएसएमटी – रत्नागिरी ही गाडी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३४ रत्नागिरी – पनवेल गाडी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी निघून पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे.

एसी गाड्यांचाही समावेश 

पनवेल – सावंतवाडी – मुंबई विशेष गाड्यांच्या २२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या ७ ते १७ सप्टेंबर दरम्यान दररोज या फेऱ्या होणार आहेत. ०१०३५ पनवेल-सावंतवाडी गाडी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी रात्री १० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३६ सावंतवाडी – मुंबई गाडी रात्री ११ वाजता सुटणार असून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोहचणार आहे. या सर्व गाड्यांना एसी थ्री टायरचे २ कोच, स्लीपर क्लासचे १० कोच, जनरल सेकण्ड क्लासचे ६ कोच असणार आहेत.

- Advertisement -

डबलडेकर गाडीच्या ६ फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी दरम्यान एसी डबलडेकर गाडीच्या ६ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी ४ ते १८ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. ०११८७ एलटीटी – रत्नागिरी एसी डबलडेकर गाडी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटून रत्नागिरीला दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे. तर ०११८८ रत्नागिरी – एलटीटी एसी डबलडेकर गाडी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी सुटून एलटीटीला रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे.

येथे थांबा घेणार

या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, ख्रेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला एसी चेअर कारचे ६ कोच असणार आहेत. याशिवाय एलटीटी – पेरनम, एलटीटी – झराप गाड्यांच्या प्रत्येकी ८ फेऱ्या, पुणे – सावंतवाडी २ फेऱ्या, पनवेल – सावंतवाडीच्या ४ फेऱ्या आणि पनवेल – रत्नागिरी – पुणे गाड्याच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -